कोल्हापूर

सीपीआर संप परिणाम

CD

वैद्यकीय अधीक्षकांच्या सतर्कतेने रुग्णाचे प्राण वाचले

सिटीस्कॅनसाठी नेताना ऑक्सिजन पाईप निसटली ः सीपीआरमध्ये संपाचा जीवघेणा फटका

कोल्हापूर, ता. १६ ः शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात सीपीआरमधील वैद्यकीय कर्मचारीही सहभागी आहेत. त्याचा रुग्णांना फटका बसला असून, आज सकाळी एका महिलेवर जीवघेणा प्रसंग ओढावला. महिलेला सिटी स्कॅनसाठी नेताना ऑक्सिजन पाईप निसटली. मात्र, प्रसंगावधान राखून वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी धावत जाऊन महिलेला ऑक्सिजन पाईप लावल्याने पुढील अनर्थ टळला.
सीपीआरमध्ये रुग्णाला एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यासाठी वर्ग चारचे कर्मचारी नियुक्त असतात. मात्र ते संपात आहेत. त्यामुळे एका वॉर्डातील महिलेला सिटी स्कॅनसाठी नेले जात होते. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजन लावला होता. तिच्यासोबत असलेल्या नातेवाइकांना ऑक्सिजन जोडण्याचे माहितीच नसल्याने सिलिंडर मागे राहिला आणि महिलेला पुढे नेत असताना महिलेच्या नाकातील ऑक्सिजन पाईप निघाली. याचवेळी डॉ. गिरीश कांबळे अन्य विभागाकडे जात होते. पाईप निघाल्याचे दिसताच त्यांनी तातडीने त्या महिलेच्या नाकात ऑक्सिजन पाईप लावली आणि महिलेला सिटीस्कॅन कक्षात पोहोचविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सीपीआरमध्ये नियमित ४० शस्त्रक्रिया आज तिसऱ्या दिवशीही होऊ शकल्या नाहीत. फक्त सहा गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. अन्य विभागांसह अपघात विभागात व्हाईट आर्मीची सर्वाधिक मदत होत आहे. केसपेपर काढण्यासाठीही व्हाईट आर्मीचे जवान मदत करत आहेत.
सीपीआरमधील तीनशेवर परिचारिका संपात सहभागी आहेत. त्यामुळे ॲडमिट रुग्णांवर आंतरवासिता डॉक्टर्स व एमबीबीएसचे विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी परिचारिका, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शेंडापार्क येथील कार्यालयातील स्टाफ यांच्या मदतीने उपचार सुरू आहेत.
..........

सीपीआरमधील उपचार सुरू

अपघात विभागासह सर्व विभागांतील उपचार सेवा सुरू आहे. यात गंभीर रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात आहेत. त्यासाठी प्राध्यापक, डॉक्टर्स तपासणी व उपचार देत आहेत. त्यामुळे सध्या उपचारासाठी दाखल असलेल्या सर्व रुग्णांवर उपचार नियमितपणे सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT