जिल्हाधिकारी राहुल रेखावार : ‘एच ३ एन२’चे दोन रुग्ण निगेटिव्ह
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : जिल्ह्यात स्वाईन फ्लू (एच३एन२) फ्लूचे पाच रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन संक्रमीत रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. स्वाईन फ्लू होवू नये यासाठी नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले. राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातही खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेखावार यांनी पत्रकाद्वारे केले. स्वाईन फ्लूची लागण झाली म्हणून रुग्णांनी घाबरून जावू नये. योग्य उपचार घेतल्यानंतर हा रोग बरा होत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू झाला म्हणून किंवा होईल म्हणून घाबरून जावू नका. पण, योग्य ती दक्षता घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.
िजिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामीण भागात सर्दी, ताप, घसा दुखी, घसा लालसर होणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाधित रुग्णांच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यानंतर त्यांना उपचार दिले पाहिजे. इन्फ्ल्यूंझा रोगासाठी लागणारी सर्व औषधे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन ठेवावीत. जिल्ह्यात या रुग्णांचे निदान करण्यासाठी सीपीआर येथील प्रयोगशाळेत असणाऱ्या किटचा वापर करावा. यासाठी विशेष मनुष्यबळ दिले जावे. अधिष्ठातांनी रुग्णांच्या तपासणीसाठी योग्य नियोजन करुन येणाऱ्या रुग्णांना वेळेत औषध उपचार देण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. वयोवृध्द किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या रुग्णांसाठी मास्कचा वापर करावा, अशाही सूचना दिल्या आहेत. यावेळी, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, डॉ. उत्तम मदने उपस्थित होते.
...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.