कोल्हापूर

आजरा ः हतीकडून नुकसान

CD

89940

होनेवाडी ः येथे टस्कराने तुडवलेले उसाचे पिक
...

होनेवाडीत टस्कराचा उपद्रव

शेतकरी हैराण ः ऊस, काजू पिकाचे नुकसान

आजरा, ता. १८ ः होनेवाडी (ता. आजरा) येथील जंगलालगतच्या ‘भुतोबा’ नावाच्या शेतात गेले चार दिवस टस्कर वावरत आहे. त्याने ऊस, काजू पिकाबरोबर नळ पाणी योजनाचेही नुकसान केले आहे. त्याच्या उपद्रवाने या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
मागील आठ दिवसांपासून टस्कर या परिसरात वावरत आहे. अनेकदा त्याचे शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. त्याच्या वावराने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी रात्रीची राखण बंद केली आहे. टस्कराने जोतिबा तिबिले यांची काजूची झाडे मोडली. मारुती पाटील यांची पाण्याची पाईप लाईन विस्कटून टाकली आहे. त्याचबरोबर मेंढोलीतील अनेक शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान केले आहे. मेंढोली व होनेवाडी जंगलालगत असलेले बारा फुट उंचीचे तारेच्या जाळीचे कुंपण तोडून तो या दोन गावांच्या हद्दीत आला आहे. गेले चार पाच दिवस त्याने या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, टस्कर या परिसरात आल्याने गव्यांचे चांगलेच फावले आहे. शेताची राखण शेतकऱ्यांनी बंद केल्याने गव्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT