कोल्हापूर

कोल्हापूर

CD

फोटो
....

सीपीआरमध्ये रुग्णांची गैरसोय

ई ॲम्बुलन्स असूनही रुग्णांना स्ट्रेचरवरून आणले

कोल्हापूर, ता.१८- सीपीआर रुग्णालयातील रुग्णांना एका वार्डातून दुसऱ्या वार्डात नेण्यासाठी इ ॲम्बुलन्सची सुविधा केली आहे. मात्र ,वैद्यकीय कर्मचारी संपात सहभागी असल्याने ही ई ॲम्बुलन्स कोपऱ्यात उभी आहे व रुग्णांना स्ट्रेचरवरून व्हाईट आर्मीचे जवान ढकलत नेत आहेत, असा प्रकार चक्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित यांच्यासमोरच आज घडला. शासकीय कर्मचारी संपामुळे आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण व रुग्णांची होत असलेली गैरसोय नव्याने समोर आली.
सीपीआरमध्ये येणारे रुग्ण अपघात विभागातून अन्य विभागात उपचारासाठी स्ट्रेचरवरून ढकलत नेले जातात. अनेकदा वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलण्याची वेळ येते. अशी गैरसोय दूर व्हावी यासाठी एका कंपनीने इ ॲम्बुलन्स भेट दिली, त्याचे पाच दिवसांपूर्वी लोकार्पण झाले. त्याचा वापरही तातडीने होणे अपेक्षित आहे.
आज सकाळी वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षासमोरील बाजूला ही ॲम्बुलन्स थांबून होती. मोड्यूलर ओटीच्या उद्घाटन समारंभासाठी पालकमंत्री येणार होते म्हणून अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांच्यासह सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

सीपीआरमधील वैद्यकीय कर्मचारी संपामुळे कामावर नाहीत, परिणामी ही ई ॲम्बुलन्स चालवण्यासाठी कोणी कर्मचारी नव्हता. त्यामुळे ॲम्बुलन्स असूनही व्हाईट आर्मीचे जवान व रुग्णाचे नातेवाईक स्ट्रेचर ढकलतच रुग्णाला एका वार्डातून दुसऱ्या वार्डात नेत होते. नवीन सुविधा उपलब्ध होऊनही रुग्णांचे हाल थांबलेले नाहीत, हेच या घटनेतून दिसून आले.
....
.....

कोल्हापूरः शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित दाजीबा देसाई व्याख्यानमालेत रविवारी बोलताना प्रा. डॉ. भारती पाटील. शेजारी संपतबापू पाटील ,बाबूराव कदम, संभाजी जगदाळे आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT