कोल्हापूर

मत मतांत्तरेसाठी

CD

त्रासदायक आतषबाजी
शहरांमधून पहावे तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने नियमबाह्यरीत्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. फटाक्यांमुळे हवा दूषित तर होतेच; पण सोबतच ध्वनी प्रदूषणाची समस्याही गंभीर रूप धारण करत आहे. नियमबाह्य फटाक्यांची आतषबाजी करणे, हा कायद्यानुसार गुन्हा असूनही कोणीही त्याची फिकीर करत नसल्याचे दिसते. या आतषबाजीचा परिणाम ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाची याबाबतची स्थिती डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखी आहे. आनंद इतर पद्धतीने व्यक्त करता येऊ शकतो. पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि त्रासदायक ठरणाऱ्या आतषबाजीवर अंकुश लावणे गरजेचे आहे.
- शाम तळोकर, इस्लामपूर

वाढीव पेन्शन जमा करावी
अनेक पेन्शनधारकांना एक हजार रुपये एवढी तुटपुंजी पेन्शन दिली जाते. या पेन्शनधारकांकडून वाढीव पेन्शनसंदर्भात ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जात आहेत. या पेन्शनरांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून कमीत कमी नऊ हजार रुपये अधिक महागाई भत्त्याची मागणी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने दिलेल्या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करून १ सप्टेंबर २०१४ पूर्वी व नंतर तत्कालीन नियमानुसार पूर्ण वेतनातून फंडात जमा झालेल्या रकमेतून फंड व पेन्शनसाठी रक्कम कपात झालेली आहे. त्यानुसार आजतागायत बँक खात्यात एक हजार रुपये जमा होत आहेत. त्यांच्याकडून कॉन्ट्रीब्युशन न घेता वाढीव पेन्शनचा लाभ द्यावा. भविष्य निर्वाह आयुक्तांनी या पेन्शनरांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महागाई भत्त्यासह उच्चतम पेन्शनवाढ करून पाडव्याच्या मुहूर्तावर जमा केल्यास आनंददायी ठरेल.
- एस. एल. कुलकर्णी, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT