कोल्हापूर

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

CD

फोटो 31021
सांगली ः जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मंडप उभारणीचा मंगळवारी प्रारंभ करताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी. शेजारी कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, प्रतापराव शिंदे, संपतराव जाधव, शिवाजी जाधव, राजेंद्र शिंदे, शिवाजी मोहिते.

लोगो - पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती

खुला गट ६५ किलोच्या पुढे
महिला कुस्तीपटू आजपासून दाखल होणार
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २१ ः पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत होणार की नाही होणार, या चर्चांचा धुरळा आज खाली बसला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलात मंडप उभारणीचा प्रारंभ झाला. दरम्यान, महाराष्‍ट्र केसरी कुस्तीप्रमाणेच या स्पर्धेत वजनगटांची रचना केली आहे. खुल्या गटात मात्र ६५ ते ७६ किलो दरम्यानच्या महिला मल्लांचा समावेश असेल. महिला कुस्तीपटू उद्या (ता. २२) दाखल होत आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्यावहिल्या स्पर्धेसाठीची तयारी अंतिम टप्प्याकडे आहे. राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघातर्फे स्पर्धा होत आहे. कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, ‘तीनवेळा महाराष्ट्र केसरी व एकवेळ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संयोजनाचा अनुभव आहे. कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सर्जेराव शिंदे राज्यभरातील लोकप्रतिनिधींना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. बेणापूर (ता. खानापूर) व बेडग ता. (मिरज) कुस्ती केंद्रातील ४० बाय ४० आकाराचे दोन मॅट स्पर्धेसाठी मागवले आहेत. क्रीडा संकुलात पश्‍चिमेकडील गॅलरीत शौकिनांची बसण्याची व्यवस्था आहे. राज्यभरातील ३० मान्यवर पंच नियुक्त केले आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था क्रीडा संकुलासह सांगली-मिरज रस्त्यावरील तुळनाड भवन, भारती विद्यापीठ, शासकीय विश्रामगृहात केली आहे.
गुरुवार (ता. २३) रोजी सकाळपासून महिला खेळाडूंची वजने घेण्यात येतील. दुपारनंतर सामन्यांना प्रारंभ होईल. शुक्रवार (ता. २४) रोजी दिवसभर सामने होणार असून, अंतिम सामना सायंकाळी होईल. प्रतापराव शिंदे, संपतराव जाधव, शिवाजी जाधव, राजेंद्र शिंदे, शिवाजी मोहिते नियोजन करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT