कोल्हापूर

राम नवमी

CD

92530
कोल्हापूर : श्रीराम नवमीनिमित्त मंगळवार पेठ राम गल्ली येथील राम मंदिरात महिलांच्या मोठ्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला.

प्रभू रामचंद्र की जय...!
विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रामनवमी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : ‘प्रभू रामचंद्र की जय...‘ अशा जयघोषात आज शहर आणि परिसरातील राम मंदिरात आज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी राहिली. दुपारी साडेबाराच्या सुमारास राम जन्मकाळ सोहळा झाला. सायंकाळनंतर पालखी, भजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहिली.
अंबाबाई मंदिरातील राम मंदिरात दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी राहिली. मंगळवार पेठेतील राम गल्लीतील मंदिरात सकाळी विविध धार्मिक विधी झाले आणि त्यानंतर परिसरातील घरोघरी गुढी उभाण्यात आली. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत दुपारी जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर महाप्रसाद झाला. न्यू महाव्दार रोडवरील श्री राम राघवेंद्र स्वामी मठात रामनवमीनित्त सकाळी विविध धार्मिक विधी झाले. त्यानंतर झालेल्या सामूहिक रामरक्षा पठणासाठी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला. शाहुपूरी राम मंदिर, मिरजकर तिकटी राम मंदिर, कसबा बावडा येथील राम मंदिर, दिलबहार तालीम साई भक्त मंडळ, श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज मठी, रंकाळवेश तालीम, सरदार तालीम साई मंदिरांसह चंद्रेश्वर गल्ली, उत्तरेश्वर पेठ परिसरातही विविध कार्यक्रम झाले.
---------------
चौकट
शिवाजी चौकात प्रतिमापूजन
शिवसेना ठाकरे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, मंजित माने, धनाजी यादव, दिनेश साळोखे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT