कोल्हापूर

दलित वस्‍ती निधी वितरण निश्‍चित

CD

दलित वस्‍ती निधी वितरण निश्‍चित
कोल्‍हापूर,ता.३०:जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाकडूनय दलित वस्‍ती निधीचे वितरण निश्‍चित केले आहे. पूर्वी केलेल्या यादीत किंचित बदल केला आहे. वितरणाचा ३९ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाकडे दिला आहे. हा निधी संबंधित गावांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाकडील दलित वस्‍तीचा निधी वंचित वाड्या वस्‍त्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावांची यादी तयार केली. निवड केलेल्या वाड्यावस्‍त्यांची यादी प्रसिद्घ केली. त्यानुसार बहुतांश गावांनी कामाचे अंदाजपत्रक तयार केले. तर काही गावांनी त्यापुढे जावून निविदा प्रक्रिया राबवत कामांनाही सुरुवात केली. मात्र, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या यादीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खासदार, आमदार यांनी सुचवलेल्या गावांचा समावेश करुन काही गावांचा निधी रद्द केला. माणगाव ग्रामपंचायतीने या निर्णयाला उच्‍च न्यायालयात आव्‍हान दिले. त्याबाबतची सुनावणी ३ एप्रिलला होणार आहे.
दरम्यान, समाजकल्याण विभागाने तयार केलेल्या यादीतील बहुतांश गावांना निधी देतानाच पूर्वीच्या रक्‍कमेतील काही रक्‍कम कमी केली आहे. कमी केलेली रक्‍कम इतर गावांना देवून लोकप्रतिनिधींचेही समाधान करण्याचा प्रयत्‍न विभागाने केला आहे. निधी वितरणाच्या अखेरच्या दिवशी जिल्‍हा नियोजन समितीने समाजकल्याण विभागाकडे निधी वर्ग केला आहे. त्यामुळे उद्यापासून दलित वस्‍तीच्या कामांना सुरुवात होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT