कोल्हापूर

अडीच लाखाचे दागीने लंपास

CD

बसमधून उतरताना महिलेचे
अडीच लाखांचे दागिने चोरीला
कोल्हापूर, ता. १७ ः कावळा नाका येथे एसटी बसमधून उतरताना महिलेची पर्स चोरट्याने पळवली. पर्समध्ये सुमारे अडीच लाखांचे दागिने होते. शनिवारी (ता.१५) संध्याकाळी पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राखी अनिकेत सोनसूरकर (वय २५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसूरकर बेळगावहून कोल्हापूरला येत होत्या. प्रवासात त्यांनी पर्समध्ये दागिने ठेवले होते. यामध्ये साडेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅमचे कानातील टॉप्स आणि रोख ५०० रुपये असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज होता. एसटीमधून उतरताना कावळा नाका येथे चोरट्याने पर्स चोरली. घरी पोहचल्यावर सोनसूरकर यांना पर्स चोरल्याचे लक्षात आले. शाहूपुरी पोलिस तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT