कोल्हापूर

जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागू

CD

जिल्ह्यात २९ एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर, ता. १८: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आजपासून २९ एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या यात्रा, जत्रा किंवा ऊरुसांमध्ये मोबाईलद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवू नये, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी हे बंदी आदेश दिले आहेत.

श्री. कांबळे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा या शांततामय मार्गाने साजरी करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रेसाठी उपस्थित लोकांसाठी हा नियम लागू होणार नाही. तसेच, ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलिस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलिस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींनाही या आदेशातून वगळण्यात येईल.
जिल्ह्यातील नागरिकांनी शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बंदी आदेशादरम्यान सोबत बाळगू नये. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर घेवून फिरू नये. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगू नये तसेच तयार करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT