कोल्हापूर

जुनी पेन्शन पत्रकार परिषद

CD

जुनी पेन्शनसाठी ३ मेपासून
मुंबईत उपोषणः सावंत

कोल्हापूर, ता. २५ : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी ३ मेपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघातर्फे त्याचे आयोजन केले आहे. त्यात राज्यातील २६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
सावंत म्हणाले, ‘राज्याच्या ३५० तालुक्यातील अनेक शिक्षक निवृत्ती वेतनाविना निवृत्त झाले. त्यातील काहींच्या नेमणुका २००५ पूर्वीच्या आहेत. तरीही त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही, असे सांगितले आहे. अशा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २६ हजार आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मानसिकदृष्ट्या ते अस्वस्थ आहेत. महाविकास आघाडी सरकारने २०४६ चा नववा वेतन आयोग गृहित धरून अहवाल तयार केला आहे. तो चुकीचा असून, जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी. ही योजना ३० एप्रिल २०२३पर्यंत लागू करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आमचे आंदोलन ही मागणी मान्य होईपर्यंत सुरू राहिल.’
समाधान घाटगे, अमोल कुलकर्णी, प्रा. सुरेश शिखरे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT