कोल्हापूर

आजरा ः आजरा साखर कारखाना

CD

आजरा कारखान्याची
प्रारुप मतदार यादी जाहीर

११ मे पर्यंत हरकती ः २२ मे पर्यंत निर्णय

आजरा, ता. २ ः आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची प्रारुप (कच्ची) मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. या यादीवर (ता.११) मे पर्यंत हरकती व आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. २२ मे पर्यंत हरकतीवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे जून महिन्यात कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे.
आजरा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२१ मध्ये संपली आहे. कोरोना व अन्य कारणांमुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली. त्यामुळे ३० जूनपुर्वी मुदत संपलेल्या कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी, त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात यावी, असे प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजरा साखर कारखान्याच्या `ब` वर्ग संस्था सभासद प्रतिनिधींची ठराव दाखल करण्याची प्रक्रिया महीनाभरात पूर्ण झाली असून एकूण १६५ संस्था सभासदांपैकी १२० संस्थांनी आपले ठराव दाखल केले आहेत. कारखान्याकडे अ वर्ग उत्पादक सभासद २५ हजार १८१ आहेत. ७ हजार ४३८ ब वर्ग अनुत्पादक व्यक्ती सभासद आहेत. कारखान्याकडे सभासद असलेल्या ४५ संस्थांचे मुदतीत ठराव प्राप्त झालेले नाहीत. २० एप्रिलला संस्था ठराव प्रक्रिया पूर्ण झाली. प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्द झाली असून या यादीवर ११ मे पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. २२ मे पर्यंत निर्णय दिला जाणार आहे. मतदार यादी आजरा तहसलीदार कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय आजरा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सह संचालक कार्यालय कोल्हापूर व आजरा साखर कारखान्यावरील नोटीस बोर्ड लावण्यात आली आहे.
...

* पंधरा दिवसात पक्की मतदार यादी

हरकतीची अंतिम तारीख ११ मे पर्यंत आहे. या कालावधीत हरकती आल्या नाहीत तर पंधरा दिवसात अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. हरकतींवर २२ मे पर्यंत निर्णय़ घेतला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT