कोल्हापूर

इन्कोव्हॅक बुस्टर डोस लसीकरणाचा लाभ घ्यावा

CD

इन्कोव्हॅक बूस्टर डोस लसीकरणाचा
लाभ घ्यावा : जिल्‍हाधिकारी रेखावार

कोल्‍हापूर, ता. ४ : जिल्ह्यात कोविड १९ लसीकरण ही नाकावाटे घ्यावयाची इन्कोव्हॅक लस उपलब्‍ध झाली आहे. हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व स्‍तरावर नियोजन करण्यात येत आहे. हे लसीकरण सकाळी ९ सायंकाळी ५ या वेळेत केले जाणार आहे. ६० वर्षांवरील लाभार्थ्यांनी या बूस्टर डोसचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
राज्यात कोविड १९ आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये झालेल्या मृत्यूचे विश्लेषण केले असता ६० वर्षांवरील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्‍त असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच जिल्‍ह्यात ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. याकरीता सर्व तालुका आरोग्य अधिकारी,
वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर कार्यशाळा झाली.
आरोग्य संस्‍थात लसीकरण सत्रावेळी कोविड लसीकरणाची व्यवस्‍था केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय, सीपीआर हॉस्पिटल येथे लस देण्यात येत आहे. या लशीचे २ डोस प्रत्येक लाभार्थीस नाकावाटे दिले जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय आदी ठिकाणी लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT