कोल्हापूर

पालकमंत्री पत्रकार संवाद

CD

विकासात अडथळा निर्माण
करण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूत

पालकमंत्री दीपक केसरकर यांची टीका

कोल्हापूर, ता. ६ : ‘बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून पत्र देणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता प्रकल्पाला विरोध करत आहेत. ते बारसू येथे केवळ विकासात अडथळा निर्माण करण्यासाठी गेले आहेत,’ अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक येथे ते अभिवादनासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केसरकर म्हणाले, ‘ठाकरे यांनी रिफायनरी बारसू येथे होण्यासाठी पत्राद्वारे सुचवले होते. महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदा प्रकल्प व्हावा म्हणून पत्र देऊन ते आता विरोध करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आत्मचरित्रात योग्यच लिहिले आहे. ते आत्मचरित्र वाचल्यास ठाकरे यांची कार्यपद्धती कळून येईल. पवार यांनी लिहिल्याप्रमाणे ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारायला नको होते. पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी पदाला न्याय देणे आवश्‍यक होते. ते आजसुद्धा पदाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यांनी आता मुलांच्या रोजगारासाठी न्याय द्यावा.’
-----

... तर आजऱ्यात मोठा प्रकल्प

छत्रपती शाहू मिलमधील मुख्य कार्यक्रमानंतरही पालकमंत्री केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांना महाराष्ट्राची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राची भरभराट होईल, असे राज्य शासनाचे धोरण असून लवकरच एक मोठा प्रकल्प आपल्याकडे येणार आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सीमेवर आजरा परिसरात तो व्हावा, अशी इच्छा आहे. त्यासाठी या परिसरातून दोनशे ते तीनशे एकर जागा मिळावी, अशी अपेक्षा आहे.’ दरम्यान, आंबा महोत्सवाच्या उदघाटनानंतर त्यांनी आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT