कोल्हापूर

भुयेवाडी कार्यक्रम

CD

01111

गुरूंना विसरल्यास मानवी आयुष्य भरकटते
संजय पाटील ः भुयेवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

कोल्हापूर, ता. ७ : जीवनात गुरुंना विसरल्यास मानवी आयुष्य भरकटत जाते, असे मत राज्यकर उपायुक्त संजय पाटील यांनी व्यक्त केले. भुयेवाडी (ता. करवीर) येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक कन्या शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम झाला.
पाटील म्हणाले, ''येथील कलानगरीच्या मातीचा सुगंध देशभरातील किंबहुना जगभरातील रसिकांना आकर्षित करतो. विद्यार्थ्यांनी आयुष्य समृद्ध करण्यासाठी विविध कलांचा आस्वाद घेणे गरजेचे आहे.''
पोलिस उपाधिक्षक सरदार नाळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवन या विषयांवर मार्गदर्शन केले. मालती-प्रकाश अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह लोकसेवा आयोगाच्या वनक्षेत्रपालपदाची परीक्षा उत्तीर्ण झालेला सौरभ पाटील, ‘म्हाडा’च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अमृता वाघमोडे, पोलिस कॉन्स्टेबल हर्षदा पाटील, ॲड. स्वागत देवकुळे, रोहित पवार, राजवी पाटील, श्रद्धा पाटील आदींचे सत्कार झाले
मुंबईचे राज्यकर उपायुक्त लालबहादूर कटारे, सरपंच सचिन देवकुळे, मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे, पांडुरंग घोरपडे, धनाजी पाटील, करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी डी. ए. पाटील उपस्थित होते. रणजीत बुगले आणि श्वेता जोग यांनी स्वागतगीत सादर केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या बारामतीमध्ये आज दोन सभा

SCROLL FOR NEXT