शिवराज महाविद्यालयात
झिरो शॅडोचा उपक्रम
गडहिंग्लज, ता. ७ : शिवराज महाविद्यालयात फिजिक्स विभागातर्फे झिरो शॅडोचा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. प्रा. गौरव पाटील यांनी स्वागत केले.
प्रा. प्रवीण सरनोबत म्हणाले, ‘‘सूर्य २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोनच दिवस विषुवृत्तापाशी येतो. २१ जूनला तो जास्तीत जास्त उत्तरेकडे कर्कवृत्ताजवळ तर २२ डिसेंबरला सूर्य जास्तीत-जास्त दक्षिणेकडे मकरवृत्ताजवळ दिसतो. तारका व ग्रह वैषविक वृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असतात. तारका व ग्रह यांच्या या कोनात्मक अंतराला ‘क्रांती’ म्हणतात. सूर्याची क्रांती ज्यादिवशी उत्तर १९ अंश होईल त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर दिसतो. वर्षातून असे दोनवेळा सूर्य आपल्या डोक्यावर येतो. त्यामुळे या दिवशी मध्यान्हाला आपली सावली पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसाना शून्य सावलीचा दिवस म्हणतात. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने ‘शून्य सावली’ आपणास अनुभवता येते. याचीच प्रचिती आपणास प्रत्यक्ष कशी अनुभवायला येते हे महाविद्यालयाच्या फिजिक्स विभागातर्फे विद्यार्थ्यांना दाखविले. या वेळी विभागाचे सर्व प्राध्यापक, बी. एस्सी. भाग एक व दोन चे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. तेजस्विनी शिंदे यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.