कोल्हापूर

‘बीबीए’, ‘बीसीए’च्या विद्यार्थ्यांना हवी शिष्यवृत्ती

CD

‘बीबीए’, ‘बीसीए’च्या विद्यार्थ्यांना हवी शिष्यवृत्ती
शुल्काचा भार पेलवेना; राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः रोजगाराची संधी मिळावी याउद्देशाने बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन), बीसीए ( बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन), बीसीएस (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स) या व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेशित होत आहेत. त्यात बहुतांश विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबांतील आहेत. मात्र, शिष्यवृत्ती मिळत नसल्याने या अभ्यासक्रमांच्या प्रवेश शुल्काचा भार पेलताना पालकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. तीन वर्षांचे शुल्क भरणे शक्य होत नसल्याने अधिकत्तर विद्यार्थ्यांना इच्छा असूनही या अभ्यासक्रमांना प्रवेशित होता येत नाही. त्यांना राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोनानंतर कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचे महत्त्व अनेकांना समजले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बीसीए., बीबीए., बीसीएस अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. मात्र, प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एस. सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. अन्य एन. टी., एसबीसी., ओबीसी, आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे बीसीएस., बीसीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी किमान ६० हजार रूपये, तर ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना ४५ हजार रूपये शुल्क भरावे लागत आहे. त्यासह अन्य शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा करावा लागतो. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या सर्वांना शासनाने शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

चौकट
विद्यार्थ्यांना असा दिलासा देता येईल?
बीसीए. बीएससी अभ्यासक्रमांची ट्युशन फी १६ हजार, तर बीबीएची ९ हजार ५०० रूपये आहे. किमान ट्युशन फी इतकी, जरी शासनाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, तरी त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोट
दोन वर्षांपासून या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये संख्या वाढली आहे. एस. सी. प्रवर्गाप्रमाणे अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे आवश्‍यक आहे. शिष्यवृत्ती मिळाल्यास जास्तीत जास्त विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेशित होतील. याअनुषंगाने गेल्या महिन्यात प्राचार्य संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. राज्य शासनाकडून याबाबत जूनपूर्वी सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.
-डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटना

चौकट
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थी
अभ्यासक्रम-मुले- मुली- एकूण
बीबीए-४८०-३३९-८१९
बीसीए-१२८६-९८६-२२७२
एकूण-१७६६-१३२५-३०९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT