कोल्हापूर

आसरानगरमधील विंधन विहीर बंद

CD

ich153.jpg
03038
इचलकरंजी : विंधन विहीरीची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
-----
आसरानगरमधील विंधन विहीर बंद
तत्काळ दुरुस्तीची मागणी; पाणी पुरवठा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा
इचलकरंजी, ता. १५ : येथील आसरानगर साईट क्रमांक १०२ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसरात असणाऱ्या सार्वजनिक पाण्याची विंधन विहीर तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे भागातील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंद असलेल्या विंधन विहीरीची तत्काळ दुरूस्ती करावी या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीतर्फे पाणी पुरवठा अधिकारी सुभाष देशपांडे यांना दिले.
आठ दिवसांत विंधन विहीर दुरुस्त केली नाही तर पाणी पुरवठा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला. निवेदनात इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन नागरिकांकडून पाणी भाडेपट्टी कर वसुली करण्यास आघाडीवर आहे. मात्र त्या बदलात देण्यात येणाऱ्‍या सुविधांबाबत आभास आल्याचे दिसत आहे. आसरानगर साईट क्रमांक १०२ मधील पाण्याची विंधन विहीर अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
येथील नागरिकांनी माजी लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विंधन विहीरीची जलद दुरूस्ती होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास पाणी पुरवठा कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला. यावेळी आपचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अभिषेक पाटील, शहर उपाध्यक्ष लक्ष्मण पारसे, शहर युवा सचिव अरिहंत उपाध्ये, शहर सहसंघटक शमसूद्दीन मकानदार, चंदनसिंग, संतोष पोवार, अर्जुन बागडे, शिल्पा भोसले, संगीता केंगार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT