कोल्हापूर

कवठेसारमध्ये प्रवेशद्वाराचे लोकार्पण

CD

jsp1620
03178
कवठेसार : येथे कर्नल मोहन पाटील प्रवेशद्वाराचे उद्‍घाटनप्रसंगी लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंडारे, मेजर जनरल विजय पिंगळे, जनरल सतिश वसाडे, श्रीमती नीता पाटील आदी उपस्थित होते.

कवठेसारमध्ये प्रवेशद्वाराचे लोकार्पण
दानोळी, ता. १६ ः कवठेसार (ता. शिरोळ) येथे कर्नल मोहन शामगोंडा पाटील प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंडारे यांच्या हस्ते झाले. मेजर जनरल विजय पिंगळे अध्यक्षस्थानी होते. मेजर जनरल सतिश वसाडे प्रमुख उपस्थीत होते.
प्रवेशद्वार श्रीमती नीता मोहन पाटील यांनी स्वखर्चाने बांधून गावासाठी अर्पण केले. स्व. कर्नल मोहन पाटील यांचे कवठेसार हे जन्मगाव असून त्यांचे शिक्षण सैनिक शाळा, सातारा येथे झाले होते. प्रथम एनडीए खडकवासा त्यानंतर डेहराडून येथून प्रशिक्षण पूर्ण केले. १९८३ मध्ये सात बटालियन गढवाल रायफल्समध्ये त्यांची भरती झाली. बास्केटबॉल, फुटबॉलसहित सर्व खेळामध्ये त्यांचे प्राविण्य होते. लाईन ऑफ कंट्रोल-कुपवाडा, जम्मू आणि काश्मिर अशा अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. ते रेजिमेंट व बटालियन फुटबॉल आणि हॉकी टीमला प्रशिक्षण देत असत. जम्मू काश्मिरमध्ये सेवा देत होते. त्यावेळी जवानासोबत बास्केटबॉल खेळत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. कर्नल मोहन पाटील यांच्या स्मृतीप्रित्यार्थ व त्यांची देश सेवेचे कार्य गावात कायम स्मरणार्थ राहण्यासाठी श्रीमती पाटील यांनी प्रवेशव्दार बांधून दिले. सरपंच पोपट भोकरे आदी उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT