कोल्हापूर

फुटबॉल

CD

फोटो  ३४६२ 
कोल्हापूर : शाहू गोल्ड चषक फुटबॉल स्पर्धेत केरळ इलेक्ट्रिसिटी बोर्ड विरुद्ध संयुक्त जुना बुधवार यांच्या सामन्यातील चुरशीचा क्षण.
(मोहन मेस्त्री : सकाळ छयाचित्रसेवा)

लोगो- 3483

शिवाजी मंडळापुढे आज केरळचे आव्हान
---
विजेतेपदाची लढत; उपांत्य फेरीत संयुक्त जुना बुधवार पराभूत
सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. १७  : शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड संघाने संयुक्त जुना बुधवारवर ४- २ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्धारित वेळेत सामना एक-एक अशा बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर देण्यात आला. ‘केएसए’तर्फे आयोजित स्पर्धा राजर्षी शाहू स्टेडियमवर सुरू आहे. केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड उद्या (ता. १८) शिवाजी तरुण मंडळाबरोबर विजेतेपदासाठी लढेल. याकडे सर्व फुटबॉल शौकिनांचे लक्ष आहे.
सामना सुरू झाल्यावर दुसऱ्याच मिनिटाला केरळच्या विक्नेश एम. याने मैदानी गोल करून जुना बुधवारला धक्का दिला. एक गोलची आघाडी मिळाल्याने केरळच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाऐवजी शांतपणे खेळ सुरू केला. जुना बुधवारच्या खेळाडूंनी मात्र मोठ्या चिकाटीने वारंवार चढाया करीत संघाला खेळवत ठेवले. दोन्ही संघांकडून चढाया होत राहिल्या. परंतु, दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली नाही. जुना बुधवारला डीच्या बाहेर मिळालेल्या फ्री किकचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. सामन्याच्या पूर्वार्धात केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड एकशून्य अशा आघाडीवर होता.
उत्तरार्धात एक गोलची आघाडी कमी करण्याच्या जिद्दीने जुना बुधवारचा संघ मैदानावर उतरला; परंतु केरळा संघाच्या शॉर्ट पासिंगपुढे जुना बुधवारला नमते घ्यावे लागले होते. दरम्यान, जुना बुधवारला ८० व्या मिनिटाला कॉर्नर किक मिळाला. किक मारल्यानंतर केरळच्या डीमध्ये हँडबॉलचे अपील झाले आणि मुख्य पंचांनी जुना बुधवारला पेनल्टी किक बहाल केली. जुना बुधवारचा खेळाडू निजो गिलबर्ट याने पेनल्टी किकचे रूपांतर गोलमध्ये करून सामना एक-एक असा बरोबरीत आणला.
निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये देण्यात आला. यात केरळने चार गोलची नोंद केली.  जुना बुधवारच्या दोन खेळाडूंनी चेंडू बाहेर मारल्याने जुना बुधवारचा संघ पराभवाच्या छायेत गेला. केरळचे विक्नेश एम., वरुण बेबी, निजो अल्बर्ट यांनी उत्कृष्ट खेळ केला. जुना बुधवारच्या सागर चिले, प्रसाद संकपाळ, इमॅन्युए, संदीप सिंग यांनी चढाया करून चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडविले.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर, महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ, डॉ. अजय केणी, डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी युवराज मालोजीराजे छत्रपती, अमर सासने, माणिक मंडलिक आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम सामना उद्या गुरुवारी (ता. १८ ) दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा केएसए तर्फे मानपत्र देवून नागरी सत्कार होणार आहे. यावेळी केरळचे चंडी वाद्यवृंद आकर्षण ठरणार आहे.

 
पेनल्टी स्ट्रोक असे ः
केरळा इलेक्ट्रिसिटी बोर्ड
निजो गिल्बर्ट  : गोल
विक्नेश एम  : गोल
मोहम्मद सलीम : गोल
मोहम्मद कट्टकोटी : अडवला
गिफ्ट गली :  गोल

संयुक्त जुना बुधवार
रिचमंड अमेथी : गोल
अभिषेक देसाई : बाहेर मारला
सुशील सावंत : बाहेर मारला 
अभिषेक भोपळे : गोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार: उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

SCROLL FOR NEXT