कोल्हापूर

कणकवली- मोक्यातील आरोपी ताब्यात

CD

कोल्हापुरातील गुन्हेगाराला
पाठलाग करून पकडले
---
कणकवलीत कारवाई; मोकातून जामीन मिळालेला
कणकवली, ता. १८ ः कोल्हापुरातील ‘मोका’तून जामिनावर सुटलेल्या संशयिताला आज मुंबई-गोवा मार्गावरून पळून जाताना कणकवली पोलिसांनी पाठलाग करून पकडले. कोल्‍हापुरातील एका गुन्ह्यात तो कोल्हापूर पोलिसांना हवा होता, अशी माहिती कणकवली पोलिसांनी दिली.
कोल्हापुरातील कारागृहातून ‘मोका’तील एका संशयिताची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यात तो कोल्हापूर पोलिसांना हवा होता. मात्र, तो तेथून शिताफीने कोकणात पोचला. ही माहिती कोल्हापुरातील पोलिसांना मिळताच त्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. संशयिताला ही माहिती मिळाली. त्यामुळे भाडेतत्त्वावर मोटार घेऊन तो पसार झाला. त्याला पकडण्यासाठी कोल्हापुरातील पोलिसांनी कणकवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार तेथील पोलिस निरीक्षक अनिल जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिल हादल यांनी त्याला पकडण्यासाठी मोबाईल लोकेशनने टॅप केले. मोबाईल ‘स्विच ऑफ’ असल्याने तपासात अडथळे आले. सायबर सेलच्या माध्यमातून त्यांनी बंद मोबाईलचे लोकेशन मिळविले. तेव्हा तो गोवा ते मुंबई महामार्गावरील खारेपाटणपासून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. कणकवली पोलिसांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. थोड्याच वेळात कोल्हापूर पोलिस तेथे पोचले. कणकवली पोलिसांनी त्याचा ताबा कोल्हापूर पोलिसांना दिला; मात्र संबंधिताचे नाव जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला. लवकरच याची सविस्तर माहिती कोल्हापूर पोलिसांकडून जाहीर होणार असल्याचेही निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT