कोल्हापूर

गोकुळ बायोगॅस प्लांट

CD

‘बायोगॅस’चा पाच हजार उत्पादकांना लाभ

सर्वाधिक बायोगॅस देणारा गोकुळ एकमेव दूध संघ

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २० : महिलांना धूर, धूळविरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे. शेण वाहून नेणे, शेणी थापणे या कामातून सुटका मिळावी तसेच गॅस सिलिंडरच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या दूध उत्पादकांसाठी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना राबवली आहे. बाजारात ४१ हजार २६० रुपये किंमत असताना गोकुळ उत्पादकांना हा प्रकल्प केवळ ५ हजार ९९० रुपये दिला आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८८० दूध उत्पादकांनी मागणी केली असून ५ हजार सभासदांना हे प्रकल्प सुरू करून दिले आहेत.
दूध उत्पादक सभासद दररोजचे शेण वाहून नेतात. त्याच्या शेणी थापतात. या शेणी सरपण म्हणून वापरतात. यामुळे प्रदूषण तर होतेच, पण महिलांना यासाठी खूप वेळ खर्च करावा लागतो. महिलांना जादा कामातून सुटका मिळावी व गॅस सिलिंडरच्या खर्चात बचत व्हावी. तसेच बायोगॅसच्या स्लरीच्या माध्यमातून शेताला सेंद्रिय खत मिळावे, सरपणासाठी वृक्षतोड होऊ न देता नैसर्गिक समतोल राखता यावा, यासाठी बायोगॅसच्या देखभाल दुरुस्तीचे दहा वर्षांपर्यंतचे काम संबंधित कंपनी करणार आहे. २ घन मीटरच्या बायोगॅससाठी ४५ ते ५० किलो दररोज शेण असणे आवश्‍यक आहे. तर, २.५ घन मीटरच्या बायोगॅस प्रकल्पासासाठी ६० ते ६५ किलो शेणाची आवश्‍यकता असते. त्यानुसार दररोज तीन तास गॅस पुरेल एवढा गॅस तयार होतो. यातून उत्पादकांच्या खर्चात बचत होत आहे. ‘गोकुळ’ने आतापर्यंत ५ हजार उत्पादकांना हा प्रकल्प दिला आहे. यासाठी प्रत्येकी ३५ हजार २७० रुपये अुनदान मिळाले आहे. त्यामुळे, या उत्पादकांना एकूण १७ कोटी ६३ लाख ५० हजार अनुदानाचा फायदा झाला आहे.
....


* बायोगॅसचा फायदा
- दररोज ३ तास स्वयंपाकाचा गॅस मिळतो
- एलपीजी गॅसपासून सुटका
- सरपण, धुरमुक्त जीवन
- दररोज मोफत १००- १३० लिटर सेंद्रिय खत
- शेतीला सेंद्रिय खत मिळते
...

* लाभार्थ्यां‍साठी या आहेत नियम व अटी
- २ ते ३ जनावरे असावीत.
- गोकुळच्या प्राथमिक दूध संस्थांकडे दूध पुरवठा असावा
- बायोगॅससाठी १२ फूट बाय १२ फूट इतकी जागा असावी
- दूध संस्थेकडे नाव नोंद करावी
...

* शेणापासून तयार होणाऱ्या स्लरीचाही फायदा

बायोगॅसमधून घरच्या घरी इंधन तयार करता येते. महिलांचे कष्ट कमी होते. गॅस सिलिंडरवर होणारा खर्च पूर्णपणे कमी होतो. याशिवाय, बॉयोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा वापर करून शेतीची सुपिकता वाढवून उत्पादनामध्ये वाढ करता येते. जनावरांच्या चाऱ्यामध्ये वाढ होऊन दूध उत्पादनांमध्ये वाढ होणार आहे.
...

‘गोकुळच्या दूध उत्पादकांना फायदा झाला पाहिजे. यासाठी बायोगॅस प्रकल्प दिले आहेत. गॅससह स्लरीचा फायदा आहे. ही स्लरी नैसर्गिक शेतीसाठी वापरता येणार आहे. कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेअंतर्गत ४१ हजार २६० रुपये किमतीचे २ घन मीटर क्षमतेचे बायोगॅस ५ हजार ९९० इतक्या कमी किमतीमध्ये दूध उत्पादकला दिले जाते. त्यामुळे, प्रति लाभार्थीला तबब्ल ३५ हजार २७० रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

विश्‍वास पाटील, ‘गोकुळ’चे मावळते अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT