कोल्हापूर

एसटीचा नवा आदेश

CD

३० रुपयांत चहा-नाश्ता द्या, अन्यथा कारवाई
---
एसटी महामंडळाच्या दक्षता पथकाचे आदेश
कोल्हापूर, ता. २८ ः एसटी महामंडळाच्या कॅन्टीन सेवा तसेच एसटीने मान्यता दिलेल्या हॉटेलातून एसटी प्रवाशांना ३० रुपयांत चहा- नाश्ता द्यावा. तसेच, जलपान सेवा दहा रुपयांत द्यावी. या दोन्ही सुविधांची एसटी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, याची काळजी घ्यावी, असे आदेश एसटी महामंडळाच्या दक्षता व सुरक्षा विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. तसेच, लेखी पत्र राज्यभरातील विभाग नियंत्रकांना दिले आहे. ‘एसटीच्या कॅन्टीन सेवेची गलिच्छता’विषयी ‘सकाळ’मधून नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर हा आदेश देण्यात आला.
आदेशात म्हटले आहे, की एसटी महामंडळाच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्या ज्या खासगी थांब्यावर विश्रांतीसाठी थांबतात, तेथे ३० रुपयांत चहा-नाश्ता सेवेची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. एसटी कार्यालयाकडून अधिकृत खासगी हॉटेलसाठी निवडपत्रे देताना एसटी प्रवाशांना ३० रुपयांत चहा-नाश्ता देण्याचे बंधन घातले. तसे पत्र हॉटेल मालकांकडून एसटी महामंडळाने घेतले आहे. त्यानंतरच त्या हॉटेलवर गाडी थांबविण्यास मान्यता दिली. मात्र, अशा अनेक हॉटेलवर याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तरीही एसटीच्या स्थानिक विभाग व आगारातील अधिकाऱ्यांकडून संबधितांवर कारवाई होत नाही, असे दिसते, ही खेदाची बाब आहे.
एसटी बसस्थानकावर ‘नाथजल’ हे छापील किमतीपेक्षा जास्त दरात विक्री केले जात असल्याचे दिसते, अशा ठिकाणी तपासणी करावी, तसेच संबंधित व जादा पैशांत नाथजल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटी स्थानकावरील एसटी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. तसेच, एसटीचे मार्ग तपासणी पथक, वाणिज्य आस्थापना पथक, पर्यवेक्षकांनी विविध भागांत प्रवास करताना एसटीने मान्यता दिलेल्या हॉटेल थांब्यावर एसटी प्रवाशांना योग्य प्रकारे सेवा दिली जाते की नाही, याची खातरजमा करावी. काही दोष आढळल्यास वरिष्‍ठ कार्यालयास लेखी अहवाल द्यावा. तसेच, संबंधित हॉटेलवर कारवाई करता येणे शक्य होईल, जेणेकरून एसटी प्रवाशांना चांगली सेवा मिळेल. तक्रार कमी होण्यास मदत होईल.
...

नोंदवहीत करावी तक्रार
दीर्घ पल्ल्याच्या एसटी प्रवासात एसटी महामंडळाने मान्यता दिलेल्या थांब्यावर एसटी बस थांबविणे चालक-वाहकांसाठी बंधनकारक आहे. तसेच, अशा हॉटेलमधून प्रवाशांना चांगली सेवा न मिळाल्यास त्याबाबत एसटीच्या चालक-वाहकाकडे असलेल्या नोंदवहीत प्रवाशांना तक्रार करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT