कोल्हापूर

चित्रपट रसिक संमेलन

CD

05564
...

पहिल्या चित्रपट रसिक
संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

कोल्हापूर ः महाराष्ट्रातील पहिल्या स्किन सिटी चित्रपट रसिक संमेलनाला चार जूनपासून पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या (कै) सुधीर नांदगावकर सभागृहात सुरुवात होणार आहे. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्या वतीने हे संमेलन होणार असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच झाले. फिल्म सोसायटी चळवळ जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी हे संमेलन होणार आहे. रसिकांबरोबरच कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा संमेलनात सहभाग असेल. दृक्-श्राव्य माध्यम हे एकविसाव्या शतकाचे अस्त्र आहे. त्याचा प्रभावी वापर अभिरुचीसंपन्न चित्रपटाच्या प्रसारासाठी करण्यासाठीचा कृती कार्यक्रम संमेलनात ठरवला जाणार आहे. समीक्षक, लेखक सुधीर नांदगावकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संमेलनस्थळाचे (कै) सुधीर नांदगावकर सभागृह असे नामकरण केले आहे. दिग्दर्शक, निर्माते व लेखक मधुर भांडारकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून, उदघाटनावेळी त्यांची मुलाखत असेल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उदघाटन होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT