शाहूपुरीत भुसुरूंग स्फोटावरून वाद
पोलिसांची मध्यस्तीः नागरिकांमध्ये रोष
कोल्हापूर, ता.२९ ः शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर सुरू असणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी दगड फोडण्यासाठी भुसुरुंग लावण्यात आला. यावेळी स्फोटातील दगड रस्त्यावर आणि आसपासच्या घरांवर, दुकानांवर पडले. त्यामुळे येथे नागरिक जमा झाले. यावेळी कामगार आणि नागरिकांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला. मात्र अद्याप याबाबतची तक्रार पोलिसांत दिलेली नाही. त्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांधकामवर पाया काढण्यासाठी दगड फोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी भुसरूंग लावण्यात येतात. आज दुपारी लावलेल्या सुरूंगामुळे स्फोट होऊन दगड रस्त्यावर तसेच आसपासच्या छपरांवर पडले. त्यामुळे नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी तेथील मुकादमाला याबाबतचा जाब विचारला. मात्र वाद वाढत गेल्याने शाहूपुरी पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला आणि नागरिकांना पांगवले. दरम्यान, आपल्याकडे भुसुरूंग करण्याची परवानगी आहे. पाण्यामुळे दगड ठिसूळ झाले आहेत, त्यामुळे ते अपेक्षेपेक्षा जास्त उंच गेले, असे येथील मुकादमाने सांगितले. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याबाबत कोणतीही तक्रार न आल्याने कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.