कोल्हापूर

वा प

CD

सह्याद्री एक्स्‍प्रेस सुरू करा
कोल्हापूर ते मुंबईदरम्यान धावणारी सह्याद्री एक्स्‍प्रेस सातारा, पुणे, मुंबईपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची होती. कोरोना कालावधीत ती बंद झाली, त्यानंतर ती सुरूच झालेली नाही. त्याचा प्रवाशांना फटका बसत आहे. रात्री धावणारी सह्याद्री एक्स्‍प्रेस प्रवाशांसाठी उपयुक्त आहे. ती पुण्यात पहाटे पोहोचत असल्यामुळे या एक्स्‍प्रेसला महत्त्व आहे. त्यामुळे या गाडीला गर्दी नित्य असायची. त्याने उत्पन्नही भरपूर मिळत होते. दुसरीकडे कोल्हापूर-मुंबई धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस गर्दीने फुल्ल असते. त्यामुळे कोल्हापूर, गांधीनगर, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने तातडीने सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करावी. त्यासाठी खासदार, मंत्री, रेल्वे अधिकारी यांनी प्रयत्न करावेत.
- दीपक पंडित, इचलकरंजी
---
शिक्षणासाठी हव्यात पायाभूत सुविधा
डॉ. वसंत काळपांडे यांचा ‘भारत केंद्री शिक्षणाची संकल्पना’ हा लेख राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचा गाभाभूत विचार स्पष्ट करणारा लेख आहे. मात्र, लेखकांनी मांडलेली ही संकल्पना केवळ एक स्वप्नच राहू नये. कोणत्याही धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुरेसे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असते. महाराष्ट्राचा विचार केल्यास सुमारे ७० हजार शिक्षकांची पदे शाळांमधून रिक्त आहेत. अनेक शाळांमधून पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदींसारख्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. असे असताना ज्ञानार्जन आणि ज्ञानदान दोन्ही काहीसे अवघडच वाटते. आर्थिक विषमतेमुळे अनेक विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत. शासनस्तरावरून शिक्षण हा विषय खरेच गांभीर्याने घेतला जातो का? त्यामुळेच भारतकेंद्री शिक्षणाची संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी आधी त्यातील पायाभूत सुविधा, पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करायला हवे.
- देवदत्त नारायण कुंभार, कोरोची (ता. हातकणंगले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT