कोल्हापूर

त्यांना मातोश्रीचे दरवाजे बंद ः विनायक राऊत

CD

‘त्या’ आमदार, खासदारांना
मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद

खासदार विनायक राऊतः गद्दारांना आमच्यात स्थान नाही

कोल्हापूर, ता. ३० ः ‘शिंदे गटामध्ये गेलेले ९ खासदार आणि २२ आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्कही केला आहे. पण आता त्या गद्दारांना आमच्यात स्थान नाही. त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत’, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोल्हापूर विमानतळावर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
एका विवाह सोहळ्यासाठी खासदार विनायक राऊत कोल्हापुरात आले होते. विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, ‘शिंदे गटातील २२ आमदार आणि ९ खासदार पुन्हा ठाकरे गटात येण्यास इच्छुक आहेत. कारण ते शिंदे गटात असंतुष्ट आहेत. त्यांना ५० खोके देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून ते मिळाले नाहीत. काही ठराविक मंत्र्यांनाच कामाचे ठेके मिळतात. बाकीच्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे ते असंतुष्ट आहेत. याची पहिली प्रतिक्रीया गजानन किर्तीकर यांनी दिली आहेत. या २२ आमदार आणि ९ खासदारांनी आमच्याशी संपर्क केला, मात्र त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.’ यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
-------

नोटबंदी सरकार

केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल खासदार राऊत म्हणाले, ‘हे सरकार नोटबंदी सरकार आहे. आधी त्यांनी ५०० च्या नोटा बंद केल्या आता २००० च्या नोटा बंद करत आहेत. काँग्रेसने सरकारला ९ प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे त्यांनी आधी द्यावीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT