कोल्हापूर

स्टेडियम गाळे भाडे

CD

06043
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियममधील गाळेधारकांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व अधिकाऱ्यांशी बैठक झाली. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

सोयी-सुविधा, देखभाल नसताना
रेडीरेकनरप्रमाणे भाडेवाढ अमान्य
छत्रपती शिवाजी स्टेडियममधील गाळेधारकांचा पवित्रा
कोल्हापूर, ता. ३१ : छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये प्रशासनाने कोणतीही सुविधा दिलेली नाही. दुरुस्ती केलेली नाही. पार्किंगचा त्रास होत आहे. अशा अवस्थेमुळे तेथील गाळेधारकांनी रेडीरेकनरप्रमाणे भाडेवाढ मान्य नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सांगितले. दरम्यान, जुन्या कराराप्रमाणे थकीत भाडे भरावे, नवीन भाडेरचनेबाबत नंतर चर्चा करू, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.
सरकारच्या निर्णयाप्रमाणे रेडीरेकननुसार भाडेवाढीच्या नोटीस स्टेडियममधील गाळेधारकांना दिल्या आहेत. भाड्याच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी ७२ गाळेधारकांनी मागील भाडे भरलेले नाही. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडाअधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्यासोबत गाळेधारकांची बैठक झाली. त्यामध्ये आर. के. पोवार, विनायक फाळके तसेच ७२ गाळेधारक उपस्थित होते. या बैठकीत गाळेधारकांनी पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कराराप्रमाणे भाडे देऊ. त्यानुसार दर तीन वर्षांनी दहा टक्के भाडेवाढ योग्य आहे. प्रशासनाने येथील गाळेधारकांसाठी स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था केलेली नाही. गळती दुरूस्त केलेली नाही. त्यामुळे स्वतःलाच दुरूस्ती करावी लागत आहे. याशिवाय बाहेरील वाहनांचे पार्किंग या गाळ्यांच्या परिसरात केले जात आहे. फुटबॉल मॅचसाठी आलेल्या नागरिकांचे पार्किंगही तिथेच केले जाते. यामुळे गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. या गाळ्यांना ४६ वर्षे झाली आहेत. अशा स्थितीत नवीन रेडीरेकनरप्रमाणे भाडेवाढ कशी करता? पूर्वी केलेल्या कराराप्रमाणे भाडे देणे शक्य आहे, असे सांगितले. तसेच मागील भाडे देण्यास थोडी मुदत द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी मुदतवाढ देणे शक्य नाही. पण येत्या दहा तारखेपर्यंत जुन्या कराराप्रमाणे भाडे भरावे. त्यानंतर नवीन कराराबाबत चर्चा करू, असे स्पष्ट केले. विठ्ठल नांगरे, सचिन पाटील, प्रफुल्ल जगताप आदी गाळेधारक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT