कोल्हापूर

देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये शिवाजी विद्यापीठ

CD

आघाडीच्या २०० संस्थांमध्ये ‘शिवाजी विद्यापीठ’

‘एनआयआरएफ रँकिंग’ जाहीर; संस्थांची संख्या वाढली, तरी स्थान कायम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२३) मध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी त्याबाबतची माहिती दिली.
सन २०१६ पासून ‘एनआयआरएफ’ क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षी अर्थात सन २०१६ मध्ये या क्रमवारीत देशभरातील अवघ्या ३५६५ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. गेल्या वर्षी म्हणजे सन २०२२ मध्ये ५५४३ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी शिवाजी विद्यापीठ १०१-१५० या बँडमध्ये होते. यंदा सन २०२३ मध्ये देशभरातील एकूण ८६८६ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्यानंतर सुद्धा शिवाजी विद्यापीठाने १५१-२०० बँडमध्ये देशातील आघाडीच्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान पटकावले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. विद्यापीठे व महाविद्यालये यांच्याबरोबरच संशोधन संस्था, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्चर व नियोजन, वैद्यकीय, दंतवैद्यकीय, कायदा, कृषी व कृषीपूरक क्षेत्रे आणि नाविन्यता या क्षेत्रांतील शैक्षणिक संस्थांचाही या क्रमवारीमध्ये समावेश आहे.
.................
कोट

‘राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या क्रमवारीमध्ये सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढून सुद्धा शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान फारसे विचलित झालेले नाही. तथापि, वर्षागणिक वाढणारी स्पर्धा आणि बदलते निकष पाहता विद्यापीठाचे स्थान उंचावण्यासाठी कोणकोणत्या निकषांवर अधिक काम करावे लागणार आहे, याविषयी सर्व संबंधित घटकांना अवगत करण्यात येईल.
-डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
.....................
या निकषांवर ठरली विद्यापीठाची क्रमवारी

अध्यापन-अध्ययन प्रक्रिया
संशोधनपर व व्यावसायिक कृतीशीलता
विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण
महिलांसह विविध वंचित समाजघटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न
विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांशी संवाद व समन्वय
............................

गेल्या चार वर्षांतील चित्र

वर्ष*क्रमवारीतील शैक्षणिक संस्थांचा सहभाग* रँकिंग बँड
२०२३*८६८६*१५१-२००
२०२२*५०४३*१०१-१५०
२०१६*३५६५*२८
..................................................................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT