कोल्हापूर

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली अकरावीची प्रवेश प्रक्रिया

CD

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली
अकरावीची प्रवेश प्रक्रिया

केंद्रीय समितीतर्फे उदबोधन वर्ग

कोल्हापूर, ता. ६ ः विद्यार्थी, पालकांनी मंगळवारी इयत्ता अकरावीच्या वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया जाणून घेतली. त्यांना केंद्रीय प्रवेश समितीतर्फे पेटाळा येथील गडकरी सभागृहात आयोजित विशेष उदबोधन वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
वर्गाच्या प्रारंभी प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी स्वागत केले. प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेची माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थी, पालकांनी कोणती दक्षता घ्यायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. अर्जातील भाग एक आणि दोन भरण्याची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. इन हाऊस कोटा, व्यवस्थापन आणि अल्पसंख्यांक कोटा, विशेष आरक्षण, वैधानिक आरक्षण याबाबतची माहिती दिली. विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे निरसन डॉ. गजानन खाडे आणि प्रा. एम. आर. नवले यांनी केले. यावेळी प्रा. मोहन जाधव, देवेंद्र भोसले, गणेश काटकर आदी उपस्थित होते.

चौकट
आतापर्यंत १४५५ विद्यार्थ्यांची नोंदणी
शहरातील विविध २८ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यमातील प्रवेशासाठी मंगळवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत एकूण १४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनी ऑनलाईन अर्जातील पहिला भाग भरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT