कोल्हापूर

कायदा मोडला की कारवाई होणार ः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत.

CD

07710

हिंदुत्ववादी संघटनांची आज कोल्हापूर बंदची हाक
कोल्हापूर, ता. ६ ः शिवराज्याभिषेक सोहळ्याला आक्षेपार्ह्य स्टेटस ठेऊन हिंदू धर्मियांचा भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज (ता.७) हिंदुत्त्ववादी संघटांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी चौकात सर्व हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते एकत्र येऊन जनतेला बंदचे आवाहन करतील, असा निर्णय आज हिंदुत्त्ववादी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. विठ्ठल मंदिरातील हिंदू एकता कार्यालयात ही बैठक झाली.
गजानन तोडकर यांनी बैठकीचा उद्देश आणि भूमिका मांडली. हेमंत अराध्ये, गजानन तोडकर, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जाणूनबुजून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र सुरू असून, लव्ह जिहाद, लँड जिहाद हा याचाच एक भाग आहे असे सांगितले. आक्षेपार्ह्य स्टेटस ठेवल्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्याची भूमिका घेतली. सर्वांनीच या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे आज कोल्हापूर बंदची हा या संघटनांनी दिली. आज (ता.७) सकाळी ९ वाजता सर्व हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येणार आहेत. तेथे महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून ध्येय मंत्र म्हटला जाईल. त्यानंतर शहरातील बाजारपेठांमधून मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात येईल. मोर्चाच्यावेळी सर्वांनी शिस्तीचे पालन करावे. कोणत्याही अश्लाघ्य घोषणा देऊ नयेत. कोणालाही दमदाटी करू नये. केवळ हात जोडून व्यवहार बंद ठेवण्याची विनंती करावी, अशा सूचना संभाजी उर्फ बंडा साळोखे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

चौकट
कायदा मोडला की कारवाई
करणार ः महेंद्र पंडित
पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणत्याही ओळखीची गरज नाही. तक्रार घेतली नाही तर त्याचे उत्तरदायीत्व माझ्याकडे आहे. कायद्याला जात, धर्म, पंथ काही नसतो. जो कायदा मोडणार त्याच्यावर कारवाई होणारच. शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राहाण्यासाठी संघटनांनी बंद मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांना केले. विठ्ठल मंदिर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंग, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपाधीक्षक अजित किटे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, महादेव वाघमोडे, सत्यवान माशाळकर यांच्यासह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT