कोल्हापूर

शरद मॅथ्स स्कॉलरमध्ये पार्श्व पाटील प्रथम

CD

jsp820
08170
इचलकरंजी : येथे शरद मॅथ्स स्कॉलर परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मुदीत सुद, विक्रांत वशिष्ट, अनिल बागणे आदिंनी पारितोषिक दिले.
----------------
शरद मॅथ्स स्कॉलरमध्ये पार्श्व पाटील प्रथम
एक लाखाचे पारितोषिक; मुदीत सुद, विक्रांत वशिष्ट यांच्या हस्ते बक्षिस
दानोळी, ता. ८ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमार्फत राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शरद मॅथ्स स्कॉलर परिक्षा घेतली होती. परिक्षेत इचलकरंजीच्या पार्श्व पाटील याने ९४ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्याला एक लाखाचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र दिले.
त्याला भारतीय सशस्त्र दलाचे कमिशन्ड अधिकारी मुदीत सुद, डीआरडिओ, एरॉनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे शास्त्रज्ञ विक्रांत वशिष्ठ व संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्याहस्ते बक्षिस दिले. श्रीमंत घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे करिअर मार्गदर्शन परिसंवाद कार्यक्रमात सन्मान केला. श्री. बागणे म्हणाले, ‘व्यवहारात व अभियांत्रिकी शिक्षणात गणित विषयाला फार महत्व आहे. गणिताविषयीचा गोडी निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.’
द्वितीय आकांक्षा मोहिते आणि पवित्रा लोहार हिने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५० व २५ हजारांचे बक्षिस व प्रमाणपत्र दिले. जिल्हानिहाय गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस दिले. कोल्हापूर जिल्हा- हर्ष जाधव, प्रतिक पाटील, क्रांतीकुमार बोरगावे, मोक्षंक गोरवाडे, परीक्षीत देसाई, तनिष्क खोराटे. सांगली जिल्हा- रामानुज लड्डा, संकेत पाटील, शरयु गुरव, समृध्दी खोत, समृध्दी शिंदे, ऋषिकेश सुर्यवंशी, सातारा जिल्हा- विक्रम कदम, विपूल सुर्वे, श्रध्दा जाधव, चैत्राली सालवे, युवराज गैरमोडे, अथर्व पाटील, सोलापूर जिल्हा- स्नेहल कोरे, वैष्णवी निकम, लक्ष्मण मोरे, दिपाली चौगुले, पृथ्वीराज जाधव, विनोद मडग्याळ, पुणे जिल्हा - आर्यन नागायकर. प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास १० हजार रुपये व इतर पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षिस व प्रमाणपत्र दिले. प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, प्राचार्य बी. एस. ताशीलदार, प्राचार्य रमेश भरमगोंडा, उपप्राचार्य एम. एम. कुंभार, प्राचार्य मेघा आवटी आदी उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT