कोल्हापूर

दंगल फोलॉप बातमी

CD

08255

दंगलप्रकरणी ३६ जणांना अटक
४०० जणांवर गुन्हे दाखल, सुमारे ७ लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः औरंगजेबाचा वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने उसळलेल्या दंगलप्रकरणी आज पोलिसांनी सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल केले. त्यातील ३६ जणांना अटक केली. ३ अल्पवयीन आरोपींना सुधारगृहात पाठवले आहे. या दंगलीत दुकाने, वाहने, हातगाड्या यांचे सुमारे ६ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. दंगलीचा तपास सुरू असून, आज राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी दंगलस्थळी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वादग्रस्त स्टेटसमुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरात दंगल झाली. यामध्ये १३ ठिकाणी दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुरांचाही वापर केला. दुसऱ्या दिवशी शहरातील सर्व प्रमुख मार्ग, चौक, प्रार्थनास्थळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शहरातील इंटरनेटसेवाही बंद होती. पोलिसांनी दंगलीचा तपास युद्ध पातळीवर सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी यांच्या माहितीनुसार दंगलीत सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. दंगलीमध्ये सहभागी तरुण बाहेरून आले होते का? याची चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. दरम्यान, आज सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यातील ३६ जणांना अटक केली. अटक केलेल्यांची नावे जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला.

चौकट
नुकसानीची नोंद करण्यास सुरुवात
दंगलीमध्ये नुकसान झालेल्यांची पोलिस ठाण्यात नोंद करण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या नोंदीमध्ये ३० रिक्षा, १० कार, १८ दुचाकी, ४० दुकाने, ११ हातगाड्या यांचे सुमारे ६ लाख ९० हजारांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT