कोल्हापूर

मुख्यालयात राहण्यास कर्मचाऱ्यांचा कानाडोळा

CD

मुख्यालयात राहण्यास कर्मचाऱ्यांचा कानाडोळा
इचलकरंजीतील शासकीय कार्यालयातील चित्र; पूरस्थितीमध्ये नागरिकांची होणार गैरसोय
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १८ : शहरातील अधिकतर शासकीय कार्यालयातील अधिकारी परगावी वास्तव्यास आहेत. पुरामुळे मार्ग बंद झाल्यास त्यांना कार्यालयात येणे शक्य होणार नाही. जनतेची प्रशासकिय कामे व्हावे यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र ते मुख्यालयात राहत नसल्याने पुरपरिस्थितीमध्ये पुरग्रस्तांसह अन्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
इचलकरंजी शहरात प्रांताधिकारी, अपर तहसील, मंडल अधिकारी, तलाठी, दुय्यम निबंधक, सहायक कामगार आयुक्त, वस्त्र कमिटी (टेक्स्टाइल कमिटी), नगर भूमापन, पुरवठा आदी शासकीय कार्यालये आहेत. येथे शहर व परिसरातील कोरोची, कबनूर, तारदाळ, चंदूर, खोतवाडी, रेंदाळ, हुपरी, साजणी आदीसह अन्य ग्रामीण भागातील कामकाज चालते. त्यामुळे ही कार्यालये अधिकतर वेळा गजबजलेली असतात. मात्र या कार्यालयामध्ये असलेले बहुतांश कर्मचारी परगावचे आहेत. त्यांची अन्य ठिकाणाहून येथील कार्यालयात बदली झालेली आहे. असे असताना ही त्यांचे वास्तव्य पूर्वीच्या ठिकाणी आहे. परिणामी त्यांना कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी दहा ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. कार्यालयातील अधिकतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
शहरालागत पंचगंगा नदी असून नदीचे पाणी पात्रा बाहेर पडून शहराला जोडणाऱ्या मार्गावर येत असते. त्यावेळी इचलकरंजीस जोडणाऱ्या अनेक गावांचे मार्ग बंद होतात. त्यामुळे इचलकरंजी शहरात कार्य करीत असलेले अनेक कर्मचारी या कालावधीत गैरहजर असतात. परिणामी शहरात उद्‌भवलेली पूर परिस्थिती हाताळण्याचे काम ठराविक कर्मचाऱ्यांवर येवून ठेपते. अन्य कार्यालयात अधिकारी हजर नसल्याने कामकाज ठप्प होते. प्रांत कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या संबंधित कार्यालयांना सूचना देण्यात येतात. मात्र तरीही अनेक कर्मचारी मुख्यालयात राहण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
-------------------
परगावचे कर्मचारी असलेली कार्यालये
अप्पर तहसील कार्यालय
मंडल अधिकारी कार्यालय
तलाठी कार्यालय
निबंधक कार्यालय
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय
नगर भूमापन कार्यालय
--------------------
मुख्यालयात पोलिसांची संख्या अधिक
बहुतांशी सरकारी कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यालयात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिसांची संख्या अधिक दिसून येते. इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी राहणे पसंत करतात.
----------------------
दोन ठिकाणी जबाबदारी असलेल्यांचा प्रश्न
खास करून महसूल कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे दोन गावांची जबाबदारी असते. अशा वेळी त्या कर्मचाऱ्याने कोणत्या गावी रहावे, याबाबत ठोस निर्णय नसल्याने हा नियम बंधनकारक करताना मर्यादा येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र याचा फायदा घेत अनेक कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT