कोल्हापूर

जी. डी. बापूंनी लोककल्याणकारी धोरणे राबविली

CD

44372

जी. डी. बापूंनी लोककल्याणकारी धोरणे राबविली
डॉ. विलास पवार; शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानमाला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः डॉ. जी. डी. बापू लाड म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी नेतृत्व आणि धगधगते अंगार होते. जाती-पातीची समीकरणे, सावकारी नाहीसे करणे, एक गाव एक पाणवठा अशी लोककल्याणकारी धोरणे बापूंनी राबविली, असे प्रतिपादन डॉ. विलास पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड व्याख्यानमालेत ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात ‘क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड : व्यक्ती आणि कार्य’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॅा. दिगंबर शिर्के, तर आमदार अरुण लाड प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘जी. डी. बापू लाड हे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही स्वकीयांसाठी आयुष्यभर लढले आणि अत्याचारमुक्त समाज निर्मितीसाठी बापूंनी प्रयत्न केले.’ डॉ. अरुण भोसले, भारती पाटील, धनाजी गुरव, मारुती शिरतोडे, श्रीकांत लाड, आर. एस. डुबल, रणजित शिंदे, जयवंत आवटे उपस्थित होते. नितीन माळी यांनी प्रास्ताविक केले. उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले. उमेश गडेकर यांनी आभार मानले.

चौकट
आमदारांचे पगार कमी करण्याची मागणी
देश स्वतंत्र झाल्यानंतर बापू आमदार म्हणून विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यावेळची सामाजिक स्थिती पाहता आण्णांनी आमदारांचे पगार कमी करण्याची मागणी केली होती, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT