कोल्हापूर

हत्तरकींच्या जयंतीनिमित्त हलकर्णीत आज कार्यक्रम

CD

हत्तरकींच्या जयंतीनिमित्त
हलकर्णीत आज कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त उद्या (ता. २९) कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हत्तरगीच्या कारिमठाचे गुरुसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती आहे. सकाळी दहा वाजता हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये कार्यक्रम होईल.
तत्पूर्वी, सकाळी नऊला हलकर्णी केंद्र मर्यादित मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. आठवी ते दहावी वयोगटातील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा होईल. दोन्ही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे ११०१, ७०१, ५०१ रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच सांगली येथील लायन्स आय हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर सांगली येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
नेत्रतपासणी शिबिराचे उद्‍घाटन भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या तर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्‍घाटन रेखा हत्तरकी यांच्या हस्ते होणार आहे. वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी, गंगाधर व्हसकोटी, आय. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT