‘कौशल्य विकास’चे
वझरेमध्ये प्रशिक्षण
उत्तूर ः वझरे पैकी घागरवाडी, खोतवाडी, बाबरवाडी ग्रुप ग्रामपंचायत आणि अनंत शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था, गडहिंग्लजतर्फे पंधरावा वित्त आयोग महिला व मुली यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाला सुरुवात झाली. पंधरा दिवस प्रशिक्षण कार्यक्रम सुरू राहणार आहे. फॅशन डिझाईन प्रशिक्षण आणि बांबूपासून विविध हस्तनिर्मित प्रशिक्षण असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संदीप गुरव अध्यक्षस्थानी होते. वंदना काटकर यांनी प्रशिक्षण कसे घेतले जाणार, याबाबत माहिती दिली. शुभांगी बुट्टे व आशा सांगावकर प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. अनंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय इंदुलकर यांनी स्वागत केले. महादेव काटकर यांनी आभार मानले.
---------
महा ई-सेवा केंद्र
उत्तूरमध्ये सुरू
उत्तूर ः येथे नव्याने सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे व तहसीलदार समीर माने प्रमुख पाहुणे होते. काशिनाथ तेली, मारुती घोरपडे, दीपक देसाई, शिरीष देसाई आदी उपस्थित होते. केंद्रप्रमुख विकास चौथे यांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.