कोल्हापूर

मतदान केंद्रावर आरोग्य पथक

CD

मतदान केंद्रावर आरोग्य पथक
वाढत्या उष्म्याचा धसका : गडहिंग्लजला २५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : उन्हाच्या ऐन तडाख्यात लोकसभा निवडणूक होत आहे. वाढत्या उष्म्याचा धसका निवडणूक विभागानेही घेतला आहे. खबरदारी म्हणून मतदारांची काळजी वाहण्यासाठी आरोग्य पथके तैनात केली आहेत. मतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर ही आरोग्य पथके कार्यरत असणार आहेत. गडहिंग्लज तालुक्यात २५२ आरोग्य कर्मचाऱ्यांचा या पथकांत समावेश केला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया पुढे सरकेल तसे राजकीय वातावरणही तापत आहे. दुसरीकडे ऐन उन्हाच्या तडाख्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासह मतदानादिवशी मतदारांची काळजी वाहण्यापर्यंत आवश्यक ती प्रत्येक गोष्ट निवडणूक विभागाकडून केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदानादिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ५ मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांना उष्णतेचा त्रास झालाच तर तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मतदान केंद्रावर पथक तैनात असणार आहे. गडहिंग्लज तालुक्यात ९२ पथके तयार करण्यात आली आहेत. आरोग्य उपकेंद्र असणाऱ्या गावातील केंद्रावर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचे पथक असणार आहे. तर आरोग्य उपकेंद्र नसणाऱ्या लहान गावात आशा स्वयंसेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
----------
दृष्टिक्षेपात गडहिंग्लज तालुका (ग्राफ करणे)
- मतदान केंद्र : २०३
- आरोग्य पथक : ९२
- पथकातील कर्मचारी : २५२
-----------------
प्रथमोपचार मिळणार
मतदान केंद्रावर नियुक्त आरोग्य पथकाला किट दिले जाणार आहे. या किटमध्ये ओआरएस, ड्रेसिंग साहित्यासह प्राथमिक उपचाराचे साहित्य व औषधे असणार आहेत. उष्म्याचा त्रास जाणवला तर मतदारांना तातडीच्या उपचारासह प्रथमोपचार मिळणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT