फोटो 84999
इच्छांवर नियंत्रण ठेवल्यास सुखी आयुष्य
राजरक्षितविजयजी ः किणी येथे विहारयात्रेत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘जो माणूस आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकतो, तो सुखी आयुष्य जगू शकतो,’ असा मौलिक मंत्र राजरक्षितविजयजी यांनी दिला. कोल्हापूर ते पुणे विहारयात्रेदरम्यान किणी (ता. हातकणंगले) येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
राजरक्षितविजयजी म्हणाले, ‘धर्माचे फळ समता असते. ज्या पद्धतीने अवकाशाला काही अंत नाही, त्याचपद्धतीने आपल्या इच्छांनाही कुठलाच अंत नाही. सध्याच्या टीव्ही आणि सोशल मीडियाच्या जमान्यात तर विविध प्रकारच्या जाहिराती अनेक इच्छांना खतपाणी घालतात. त्याचा परिणाम लहान मुलांवरही होत असून, पालकांकडे त्यांच्या मागण्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच जागे होण्याची वेळ आली आहे. साधे जीवन आणि उच्च विचारसरणी सर्वांनाच आत्मसात करावी लागणार आहे.’ दरम्यान, बुधवारी (ता. २२) इस्लामपूर येथील जैन संघात राजरक्षितविजयजी मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.