कोल्हापूर

राजकीय बातमी

CD

जिल्ह्यात विधानसभेसाठी खडाखडी सुरू
इच्छुकांची तयारी ः काहींनी फुंकले रणशिंग, काहींच्या सावध हालचाली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आज जिल्ह्यात विधानसभेसाठी खडाखडी सुरू झाली आहे. त्यातून महायुती आणि महाविकासमधील जागा वाटपांचे सूत्र ठरण्यापूर्वीच काहींनी रणशिंग फुंकले आहे, तर काहींनी मतदारसंघाचा कानोसा घेत सावध हालचाली सुरू केल्या आहेत. कार्यकर्ते, मतदार यांना गृहित धरून घेतलेले निर्णय आवडत नाहीत याचा वस्तुपाठ लोकसभेच्या निकालाने दिल्याने नेतेही अंदाज घेऊनच राजकीय रणनिती आखत आहेत.
लोकसभेच्या निकालात राज्यात महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीने बाजी मारली. काही मतदारसंघांतील अनपेक्षित निकालाने सत्तेच्या जोरावर हवेत असलेल्या महायुतीच्या नेत्यांना मतदारांनी जमिनीवर आणले आहे. कोल्हापुरातही हेच चित्र पाहायला मिळाले. हातकणंगलेत महायुतीचा उमेदवार विजयी झाला असला तरी त्यांना मिळालेले मताधिक्य आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे, तर कोल्हापुरातील पराभवामागची कारणे शोधून त्यावर युतीच्या नेत्यांना मार्ग काढावा लागणार आहे.
विधानसभेसाठी महायुती आहे तशीच राहील; पण ‘महाविकास’मध्ये शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आघाडीतील काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर युती-आघाडीतील जागा वाटप निश्‍चित होईल; पण तोपर्यंतच कागलमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ, राधानगरीतून माजी आमदार के. पी. पाटील यांनी रणशिंगही फुंकले आहे. महायुतीत या जागा विद्यमानांना दिल्यास मुश्रीफ कागलमधून, तर राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर निश्‍चित आहेत. अशा परिस्थितीत के. पी. हे काँग्रेसचा दरवाजा ठोठावणार की, त्यांचे मेव्हणे काँग्रेसचे उमेदवार असणार हे पाहावे लागेल. करवीरमधून कै. पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना सेनेकडून माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात असतील. कोल्हापूर दक्षिण, उत्तर महाविकास आघाडी काँग्रेसकडेच राहील, पण ‘उत्तर’ चा उमेदवार कोण याविषयी उत्सुकता असेल. चंदगडमध्ये महायुतीत सहभागी राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील हेच उमेदवार असतील; पण त्याचवेळी भाजपचे शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर थांबणार की, बंडखोरी करणार याविषयी संभ्रमावस्था आहे.
हातकणंगले विधानसभेत काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे, ठाकरे गटाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव आवळे इच्छुक आहेत. आघाडीत विद्यमान म्हणून राजूबाबा रिंगणात राहिले तर लोकसभेला खांद्याला खांदा लावून राबलेले डॉ. मिणचेकर, राजीव आवळे काय करणार ? हा प्रश्‍न आहे. इचलकरंजीत आघाडीकडून ढिगभर इच्छुक आहेत; पण महायुतीत पुन्हा प्रकाश आवाडे की, भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. शाहूवाडी विधानसभेत पुन्हा एकदा डॉ. विनय कोरे व सत्यजित पाटील-सरूडकर या पारंपरिक विरोधकांतच सामना असेल. त्यात श्री. सरूडकर यांना सहानुभूती मिळणार की, महायुतीच्या जोरावर डॉ. कोरे बाजी मारणार याची उत्सुकता असेल. शिरोळच्या मैदानात पुन्हा एकदा उतरून माजी खासदार राजू शेट्टी आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील व ‘दत्त-शिरोळ’ चे गणपतराव पाटील यांचे आव्हान असेल. स्वतः श्री. शेट्टी रिंगणात उतरणार की, विश्‍वासू सहकाऱ्यांना उतरवून संघटनेची ताकद दाखवणार हे निश्‍चित नाही; पण या मतदारसंघात ताकद लावली तर महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण लोकसभेला निर्माण झाले आहे, त्या जोरावर विजय दृष्टिक्षेपात येऊ शकतो. पण उमेदवार कोण ? यावरच ही लढत ठरेल.

चौकट
लोकसभा निवडणुकीतून दिला धडा
लोकांना किंवा कार्यकर्त्यांना गृहित धरून निर्णय घेतला तर काय होऊ शकते याचा धडा लोकसभेच्या निकालाने दिला आहे. त्यामुळे पुन्हा तोच कित्ता नेत्यांनी गिरवून उमेदवारी लादण्याचा प्रयत्न केला तर त्याचे पडसाद निकालात उमटू शकतात. याचा अंदाज नेत्यांनाही आहे. त्यामुळे कागल, राधानगरी सोडल्यास अन्य मतदारसंघात फारशा घडामोडी दिसत नाहीत. नेत्यांच्या पातळीवर ‘वेट अँड वॉच’ अशीच भूमिका दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : धामणगाव येथे नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

Jalgaon Crime : जळगावमध्ये 'गँगवार', राज शाळेजवळ तरुणावर कोयता, चॉपरने हल्ला

SCROLL FOR NEXT