कोल्हापूर

आयुष्य जसे आहे, तसे जगायला शिका

CD

27477
प्रसाद कुलकर्णी
..........
आयुष्य जसे आहे, तसे जगायला शिका

प्रसाद कुलकर्णी ः आनंदयात्रा एकपात्री कार्यक्रम उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः ‘आयुष्य सुंदर आहे. ते जसे आहे, तसे जगायला शिका. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा,’ असे मत प्रसिद्ध कवी व प्रेरणादायी व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सारस्वत विकास मंडळच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज त्यांचा ७७० वा ‘आनंदयात्रा’ हा एकपात्री कार्यक्रम झाला. गोविंदराव टेंबे नाट्यगृह (देवल क्लब) येथे रंगलेल्या या कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील किस्से आणि उदाहरणे देत आयुष्याबद्दल सुंदर विवेचन केले.
आयुष्य खूप छान आहे. आपण नको त्यावेळी नको त्या गोष्टींना अतिमहत्त्व देतो. घडून गेलेल्या गोष्टींचे दुःख उगाळत बसतो. नियतीवर हुकूमत कुणाचीच चालत नाही. याचे उदाहरण देताना ते म्हणाले, ‘प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा असतो. आयुष्य जगताना ज्यात रस आहे, त्याप्रमाणे जगायला शिका. कर्तृत्व आणि चारित्र्य या गोष्टी कोठेही विकत मिळत नाहीत. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर दहावीत नापास झाला. आता दहावीच्या पुस्तकात सर्वप्रथम त्याचा धडा आहे. आपल्याला कित्येक कोट्यवधी रुपयांचा धनादेश परमेश्‍वराने दिला आहे. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. पेला भरलेला आहे की अर्धा आहे, याकडे कसे पाहणार, त्याप्रमाणे जग आहे.’
कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा शेवट ‘जब आप आये इस जग में, तो जग हसें और आप रोए. आप ऐसी करणी किजीये की, आप हसे और जग रोए’ या कबिरांच्या कवितेतील ओळींचा अर्थ सांगून केला.
दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय सांगीतिक कलाकार इंद्रनिल कामत, तनय कामत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोहन देशपांडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ लाटकर, पदाधिकारी अमित सलगर, सारस्वत विकास मंडळाचे सचिन जनवाडकर, सहसचिव शरद कारखानीस, गुरुनाथ देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT