कोल्हापूर

महावितरण वीज कंत्राटीचा सत्कार

CD

कोल्हापूर ः ‘उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी’ पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यासोबत प्रभारी मुख्य अभियंता गणपत लटपटे अन्य अधिकारी.
-
कामगारदिनी ६४ वीज कर्मचाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर जिल्ह्यातील ३६, सांगली जिल्ह्यातील २८ जणांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः महावितरणाच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनामिमित्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ६४ वीज कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी’ पुरस्काराने गौरवले. सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता(प्र.) गणपत लटपटे यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. कर्मचाऱ्यांनी केलेले प्रशासकीय कामकाज व ग्राहक सेवा या निकषांवर आधारित निवड समितीने पुरस्कारासाठी निवड केल्या. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ३६, तर सांगली जिल्ह्यांतील २८ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
श्री. लटपटे म्हणाले, ‘तांत्रिक कर्मचारी लाखो किलोमीटर लांबीच्या वीज वितरण यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करतात व ग्राहकांना सेवा देतात नैसर्गिक संकटकाळात प्रसंगी जीव धोक्यात घालून कर्मचारी ग्राहकांना सेवा देतात. ग्राहक व महावितरण यांच्यातील दुवा म्हणून वीज कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.’
सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता सुधाकर जाधव, सुनीलकुमार माने, अभिजित सिकनीस, प्रशांतकुमार मासाळ, दत्तात्रय भणगे, जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले आदी उपस्थित होते. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी प्रास्ताविक केले. उत्तम पाटील यांनी आभार मानले.
-
उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी असे ः
युवराज शेवाळे (शाखा कार्यालय बाचणी), गणेश कांबळे (बाजारभोगाव), प्रदीप पाटील (काखे), अमर सणगर (पन्हाळा), सचिन खवले (बालिंगा), सुरेश पाटील (गगनबावडा), महेश यादव (वारुळ), किरण पुजारी (गांधीनगर), सतीश कोळी (लिंगनूर), समिंदर साठे (पाटगाव), निवास सूर्यवंशी (सरवडे), बाळगोंडा खुरपे (पट्टणकोडोली), सचिन खाडे (म्हाकवे), शशिकांत गुरव (प्रतिभानगर), मानसिंग वरुटे (महाद्वार रोड), संतोष चव्हाण (लक्ष्मीपुरी), रणजित गायकवाड (सर्किट हाऊस), स्वप्नील तोरस्कर (जाधववाडी), प्रकाश हराळे (अब्दुललाट), सर्जेराव सिसाळ (इचलकरंजी पश्चिम), सुनील खाडे (शहापूर), अरिफ मुल्लाणी (भादोले), तुकाराम बनबरे (शिरोळ), सुनील पोवार (हातकणंगले), शिवाजी कोळी (जयसिंगपूर दक्षिण), महेश दानवाडे (कुरुंदवाड ग्रामीण २), प्रकाश पोटे (नेसरी), किरण गावडे (कोवाड १), भरत सोनार (आजरा ३), बाळकृष्ण कडूकर (गडहिंग्लज ग्रामीण).
-
-उत्कृष्ट यंत्रचालक-
संजय कांबळे (उपकेंद्र बोलोली), प्रतापराव खोत (पट्टणकोडोली), संजय कावणेकर (शिवाजी विद्यापीठ), महेश चव्हाण (माणगाव), इंद्रजित पाटील (लाटवडे), अविनाश खोत (हेब्बाळ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस

Oats-Paneer Dosa: प्रोटीन आणि फायबरचा पॉवरहाऊस! वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये नक्की अॅड करा ओट्स-पनीर डोसा

SCROLL FOR NEXT