70513
लोगो - तनिष्का
‘तनिष्कां’नी तयार केले
आठ टन गांडूळ खत
आंबा येथील यशस्वी प्रकल्प; दीड लाखांची उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : आंबा (ता. शाहूवाडी) येथील तनिष्का गटाने वर्षात आठ टन गांडूळ खतनिर्मिती करत दीड लाखांची उलाढाल केली. या माध्यमातून ३० तनिष्का सदस्यांना रोजगार उपलब्ध झाला असून इतरांच्या शेतात किंवा इतर ठिकाणी काम करावे लागत नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सन्मानाचे हसू उमलत आहे.
गांडूळ खतासाठी गावातील शेणखत, पालापाचोळ्याचा वापर केला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे गांडूळ खतासाठी आठ बेड दिले. तनिष्का गटप्रमुख स्वाती गद्रे सांगतात, ‘‘आंबा गाव डोंगरी पट्ट्यात येते. भात, नाचणी प्रमुख पिके. घरटी दोन-चार गाई, म्हशी, शेळ्या आहेत. या जनावरांपासून मिळणारे शेण आणि पालापाचोळा गोळा करून गांडूळ खतनिर्मितीचा निर्णय घेतला. प्राची बेंडके, अर्पिता गवरे, आरती भोसलेंसह चार महिलांची साथ मिळाली. खतनिर्मितीसाठी चाळणवाडीतील श्रुती पाटील यांनी मार्गदर्शन केले. चाळणवाडीमधील दहा महिलांना गांडूळ खतनिर्मिती प्रशिक्षण, बेड दिले. खताबरोबर व्हर्मिवॉश, जीवामृत, घनजीवामृत गोवरी निर्मितीला चालना देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. सोलर ड्रायर उत्पादन, अळंबी उत्पादन तसेच देशी वृक्ष रोपवाटिकेला सुरवात केली आहे. प्रकल्पात मानोली, केर्ले, तळवडेतील तीस महिला जोडल्या जातील.’’
उपाध्यक्षा प्राची बेंडके म्हणाल्या, ‘‘गांडूळ खत, व्हर्मिवॉश, जीवामृत, गोवरी खरेदी शिवसमर्थ ॲग्रोटेक प्रॉड्युसर लि. कंपनीतर्फे केली जाते. कंपनीमार्फत ऊस, भाजीपाला, रताळी उत्पादक तसेच कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना सेंद्रिय खतपुरवठा होतो.’’
टेरेस गार्डन किट निर्मिती
शहरातील बागप्रेमींसाठी गांडूळ खत, गोखूर खत, व्हर्मिवॉश, जीवामृत, घनजीवामृत गोवरी, गोमूत्र आणि देशी भाजीपाला बियाणे पाकीट असे ‘गार्डन किट’ तयार केले आहे. सेंद्रिय खतवापर आणि निर्मितीबाबत मार्गदर्शन करतो, अशी माहिती सचिव अर्पिता गवरे आणि खजिनदार आरती भोसले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.