कोल्हापूर

आसमा क्रिकेट

CD

80685
कोल्हापूर : आसमा चषक क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता ‘सकाळ’ संघाला चषक देताना फेमचे अध्यक्ष महेश कराडकर. शेजारी आसमाचे अध्यक्ष सुनील बासराणी.

‘आसमा’ क्रिकेट स्पर्धेत ‘सकाळ’ उपविजेता
कोल्हापूर, ता. ५: आसमा चषक क्रिकेट स्पर्धेत जिल्हा मुद्रक संघ विजेता तर ‘सकाळ’ उपविजेता ठरला. ॲड एजन्सीज व मीडिया असोसिएशनतर्फे (आसमा) शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा झाली.
सकाळविरुद्ध मुद्रक संघ यांच्यात अंतिम सामना झाला. ‘सकाळ’ने ८ षटकांत ७५ धावा फटकावल्या. मुद्रक संघाने हे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला. आसमाच्या विविध सभासदांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
तीन वर्षे कोविडच्या कारणास्तव या स्पर्धा झाल्या नव्हत्या. यंदा आठ संघांत स्पर्धा झाली. सर्व सामने शेवटच्या षटकांपर्यंत अटीतटीने खेळले गेले.
यंदा तृणधान्य अर्थात मिलेट वर्ष केंद्र सरकारने घोषित केले आहे. त्याचे महत्त्व सर्वांपर्यंत पोचावे यासाठी त्यावर आधारित ''मिलेट कट'' अशी थीम स्पर्धेसाठी बनवली होती.
आसमाचे अध्यक्ष सुनील बासराणी, स्पर्धा कमिटी चेअरमन मनीष राजगोळकर, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, सचिव संजीव चिपळूणकर, खजानिस राजाराम शिंदे, सभासद प्रशांत बुचडे, सुनील बनगे, सुहास लुकतुके, अभय मिराशी, अमरदीप पाटील, अमरसिंह भोसले, अतुल उपळेकर, संजय रणदिवे, संजय थोरवत, सुधीर शिरोडकर, राजू परुळेकर, अनिरुद्ध गुमास्ते, शरद पाटील, विवेक मंद्रूपकर, प्रशांत कुलकर्णी यांनी संयोजन केले.
..........
उत्कृष्ट असे :
मालिकावीर : शिवाजी खांडेकर
सामनावीर : महेंद्र आंबेकर
फलंदाज : महेंद्र आंबेकर
गोलंदाज : संदीप वणिरे
क्षेत्ररक्षक : विजय नाईक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT