कोल्हापूर

भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी भाग ३

CD

फोटो -

भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी

भाग ३

प्राणी-पक्ष्यांसह समाजकार्यात रमलेला आनंदयात्री

धनंजय नामजोशीचा अनोखा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ : एखाद्या प्राण्याचा अपघात असो अथवा घरात साप आलेला असो, कॉल आला की, काम सोडून धनंजय वामन नामजोशी तेथे पोचतात. प्राण्यावर तत्परतेने उपचार सुरू करतात. दुखापत गंभीर असेल तर पांजरपोळमधील राजकुमार बागल किंवा रुईकर कॉलनीतील डॉ. अनिल पाटील यांच्याकडे त्याला घेऊन जातात. साप असेल तर त्याला कोणी मारू नये, यासाठी प्रबोधन करतात. अगरबत्तीचा व्यवसाय करत त्यांनी प्राणिमित्र म्हणून ओळख निर्माण केली आहे, शिवाय थॅलेसिमियाग्रस्तांच्या मदत करण्यात ते सरसावतात.
श्री. नामजोशी यांच्या वडिलांचा अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय. त्यांच्यासमवेत ते ठिकठिकाणी जायचे. न्यू पॅलेस परिसरात फेरफटका हमखास असायचा. तिथले प्राणी बघून नामजोशी यांना प्राण्यांबद्दल आस्था निर्माण झाली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी अगरबत्ती व्यवसायात लक्ष घातले. सर्पमित्र म्हणून त्यांनी २००४ पासून कामाला सुरुवात केली. हे काम करताना शहरातल्या गल्लीबोळात वस्तीत आलेल्या सापाला त्यांनी पकडून जीवदान देण्याचे काम केले. आजवर त्यांनी २००० हून अधिक सापांना जीवदान दिले आहे.
मांजा दोऱ्यात अडकलेल्या घारी, वटवाघूळ, कबूतर व घुबड यांच्यावर उपचार करण्याचे त्यांचे काम आजही सुरू आहे. विजेचा झटका बसून जखमी झालेल्या माकडांवर त्यांनी उपचार केले आहेत. आजतागायत त्यांनी ८०० हून अधिक पक्षी व प्राण्यांवर उपचार केले आहेत. फाईट अगेन्स्ट थॅलेसिमिया अॉर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. कोरोना काळात थॅलेसिमिया रुग्णांना त्यांनी औषधे घरपोच पाठवली. ज्या जिल्ह्यात रुग्णांना रक्त मिळत नसेल, तेथे रक्तपेढ्यांशी समन्वय साधून रक्त उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. Blood @ 24×7 Group व्हाट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून गरजूंसाठी अर्ध्या तासात रक्त किंवा रक्तदाता उपलब्ध करून देत आहेत.
........
चौकट
श्री. नामजोशी व्हाईस ओव्हर व मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी गेल्या वीस वर्षांत अंधशाळा, बालकल्याण संकुल, कुष्ठधाम, हेल्पर्स अॉफ हॅन्डिकॕप्ड, सावली केअर, मातोश्री वृध्दाश्रम (चंबूखडी), करुणालय संस्था, कळंबा कारागृह, अंध वसतिगृह (हणबरवाडी), मातोश्री वृध्दाश्रम (आर.के. नगर), मध्यवर्ती कारागृहात मिमिक्रीचे कार्यक्रम सादर केले. लोकांच्या मदतीला धावताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले पाहिजे, ही त्यांची भावना आहे.
.........
संदीप.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT