कोल्हापूर

शिष्यवृत्ती परीक्षा

CD

३७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
पाचवीसाठी १५३, तर आठवीसाठी १०० केंद्रे

कोल्हापूर, ता. १२ : जिल्ह्यातील २४ हजार २२२ विद्यार्थ्यांनी पाचवी, तर १२ हजार ८१७ विद्यार्थ्यांनी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे विविध परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन केले होते.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला होता. परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर ते पालकांसमवेत केंद्रांवर आले होते. त्यांच्या ओळखपत्रांची तपासणी करून त्यांना केंद्रांवर प्रवेश देण्यात आला. पाचवीसाठी २४ हजार ४२८, तर आठवीसाठी १३ हजार १ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. पाचवीसाठी १५३, तर आठवीसाठी १०० केंद्रे होती. परीक्षेसाठी २५३ केंद्र संचालकांची जिल्हा स्तरावरून नियुक्ती केली होती. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड माध्यमातून परीक्षा झाली.
करवीर तालुक्यातून पाचवीसाठी सर्वाधिक ३३७५ तर आठवीसाठी १६५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. कोल्हापूर महापालिका परिसरातून पाचवीसाठी सर्वाधिक ५५ व आठवीसाठी ४३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT