कोल्हापूर

वय वर्षे ६५ अन् रेस जिंकल्या ५६४!

CD

12300
शशिकांत कसबेकर

वय वर्षे ६५ अन् रेस जिंकल्या ५६४!
घोडेस्वार कसबेकर यांचे प्रावीण्य; नवी पिढी घडविण्याचेही कार्य
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : वय वर्षे पासष्ट अन् हॉर्स रेस जिंकल्या ५६४, हे ऐकून आश्चर्य वाटेल. कोल्हापूर संस्थानातील नामांकित घोडेस्वार पांडुरंग खाडे यांच्या नातवाने ही कमाल केली आहे. या वयातही त्यांचे घोडेस्वारीतील प्रावीण्य कायम असून, घोडेस्वारीत नवी पिढी घडविण्याचे काम ते आता करत आहेत. शशिकांत विलास कसबेकर असे त्यांचे नाव आहे. दुधाळीत ते वास्तव्यास आहेत.
कसबेकर यांनी प्रायव्हेट हायस्कूलमधून आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे आजोबा खाडे संस्थान काळातले आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सहवासात त्यांना घोडेस्वारीचा छंद जडला. आजोबा कधी मुंबई, तर कधी बंगळूरला प्रशिक्षणासाठी जायचे.
त्यांच्यासोबत कसबेकर जायचे आणि घोडेस्वारीतील बारकावे समजून घ्यायचे. घोड्याच्या जाती, त्यांचे खाद्य, आरोग्य यांचा अभ्यास करण्यात त्यांनी कसूर केली नाही. पुढे हॉर्स रेसमध्ये त्यांनी त्यांचे कर्तुत्व सिद्ध केले. कोलकता, बंगळूर, म्हैसूर, हैदराबाद, उटी, चेन्नई येथे झालेल्या स्पर्धांत त्यांचे बक्षीस ठरलेले असायचे. त्या काळात त्यांना अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत बक्षीस मिळायचे.
घोडेस्वारीच्या निमित्ताने ते १९७८ ते १९९८ पर्यंत कोलकत्यात राहिले. तेथे जॉकी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. कोलकत्ता सोडल्यानंतर २००६ पर्यंत ते हैदराबादमध्ये होते. सध्या घोडावत रायडिंग क्लबमध्ये ते कार्यरत आहेत. मुलगा सौरभ आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. मुलगी शिवांगी गृहिणी आहे.
ते म्हणाले, ‘‘माझे करियर कशात होईल, याची चिंता मी केली नाही. घोडेस्वारीत मात्र मन लावून काम केले. रायडर्ससाठी लागणारे कौशल्य आजोबांकडून शिकून घेतले. घोडेस्वारीचे प्रशिक्षण कोणीही घेऊ शकतो. त्यासाठी घोड्याचे मानसशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे.’’
---------------
कोट
माझ्या आईचे मामा म्हणजे पांडुरंग खाडे. संस्थान काळात त्यांचा हॉर्स रायडर म्हणून लौकिक होता. इंग्लंडमधल्या क्वीन्स कप त्यांनी जिंकला होता.
- शशिकांत कसबेकर
-------------
चौकट
शामराव चव्हाण यांचाही लौकिक
विशेष म्हणजे कसबा बावड्यातील शामराव चव्हाण हेही नामांकित जॉकी. हार्ड रायडर म्हणूनच ते फेमस होते. त्यांनी १९४० ते १९९४ अशी तब्बल ५४ वर्षे हॉर्स रायडिंग केले. श्रीलंकेतील चौदा वर्षांचा घोडेस्वारीतील विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. त्या काळात राजाराम महाराज यांचा ‘राधाबाई, राजाराम, शिवाजी’ नावाने एक संघ स्पर्धेत उतरायचा. त्याचे प्रतिनिधित्व ते करायचे. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर तेथे त्यांनी घोडेस्वारीचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT