कोल्हापूर

पॅकर्स, भिडे, फायटर्स, मोगणे क्लबचा विजय

CD

लोगो-आमदार चंद्रकांत जाधव स्मृतिचषक

पॅकर्स, भिडे, फायटर्स,
मोगणे क्लबचा विजय
कोल्हापूर, ता. ३० : आमदार चंद्रकांत जाधव स्मृतिचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पॅकर्स, भिडे, फायटर्स, अण्णा मोगणे क्रिकेट क्लबने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आज विजय मिळवला. शांद फाउंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शास्त्रीनगर मैदानावर पॅकर्स क्लबने २० षटकांत पाच गडी गमावून १३२ धावा केल्या. प्रतीक कदमने ४६ चेंडूंत नाबाद ६७ धावांची खेळी केली. सातारा संघाकडून सिद्धार्थ जगदाळेने दोन गडी बाद केले. सातारा संघाला सात गडी गमावून १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रतीक कदम सामनावीरचा मानकरी ठरला.
भिडे स्पोर्टस्‌ विरुद्ध सागरमाळ स्पोर्टस्‌ यांच्यातील सामन्यात सागरमाळ स्पोर्टस्‌ने ११५ धावा केल्या. प्रणय अरमाळकरने २५ धावा केल्या. भिडेकडून शरद पाटीलने चार गडी तंबूत परतवले. भिडे स्पोर्टस्‌ने १८ षटकांत ११६ धावा करत सामना जिंकला. तुषार पाटीलने २८, तर शरद पाटीलने नाबाद २२ धावा केल्या. शरद पाटील सामनावीर ठरला.
शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानावर रमेश कदम अॅकॅडमी विरुद्ध फायटर्स क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. फायटर्स क्लबने १८५ धावा केला. उत्तरादाखल रमेश कदम अॅकॅडमीने ९३ धावा केल्या. फायटर्स क्लबने ९२ धावांनी हा सामना जिंकला. करण सांगावकर याला सामनावीरचे बक्षीस देण्यात आले.
अण्णा मोगणे क्रिकेट क्लब व पोलाईट क्रिकेट क्लब यांच्यात सामना खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना मोगणे क्लबने २० षटकांत १७५ धावा केल्या. सूरज कोंढाळकरने ५५ चेंडूत ६८ धावा केल्या. पोलाईटचा संघ १४८ धावांत गारद झाला. सूरज सामनावीर ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT