कोल्हापूर

फुटबॉल

CD

लोगो-चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा
94067
कोल्हापूर : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस विरुद्ध संध्यामठ यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

बालगोपाल, प्रॅक्टिस क्लब विजयी
खेळाडूंचा लागला कस; सोल्जर्स ग्रुप, संध्यामठ तरूण मंडळ पराभूत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : चंद्रकांत चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने सोल्जर्स ग्रुपला २-० ने पराभूत केले. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने संध्यामठ तरूण मंडळावर १-० ने पराभव केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अनुभवी बालगोपालसमोर सोल्जर्सच्या खेळाडूंचा आज कस लागला. त्यांना बालगोपालच्या खेळाडूंना रोखण्यासाठी रणनीती आखावी लागली. एकामागोमाग एक चढाया होत असल्याने सोल्जर्सच्या बचावफळीतील खेळाडू सतर्क राहिले. बालगोपालकडून व्हिक्टरने १८ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर बालगोपालच्या समर्थकांनी जल्लोष केला. त्यानंतर पुन्हा व्हिक्टरने ३१ व्या मिनिटाला गोल करत संघाच्या खात्यात दुसऱ्या गोलची नोंद केली. साहील डाकवे, ऋतुराज पाटील, कुणाल नाईक, प्रसाद सरनाईक यांनी चढाया करत सोल्जर्सच्या खेळाडूंची दमछाक केली. सोल्जर्सच्या खेळाडूंनी प्रतिचढाया केल्या. मात्र, त्यात समन्वयाचा अभाव होता. तसेच दिशाहीन फटक्यांमुळे त्यांना गोल करता आला नाही. सोल्जर्सकडून युवराज पाटील, सिद्धेश देसाई, ऋतुराज निकम, स्वप्नील पाटील यांनी चढाया केल्या.
प्रॅक्टिस विरूद्ध संध्यामठ यांच्यातील सामना अनुभवी खेळाडूंतील होता. त्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. दोन्ही संघांकडून सातत्यपूर्ण व जोरदार चढाया झाल्या.
संध्यामठच्या इम्रान बांदारने प्रॅक्टिसच्या राहूल पाटील याला गोलक्षेत्रात धोकादायकरित्या अडवले. मुख्य पंचांनी प्रॅक्टिसला पेनल्टी किक बहाल केली. त्यावर राहूलने २६ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिसकडून चिमा, सचिन गायकवाड, सागर पोवार, रोहीत भोसले, सागर चिले, तर संध्यामठकडून प्रविण मिरजकर, ऋषिकेश तांबे, यश जांभळे, तुषार म्हसवेकर, अनिरुद्ध शिंदे यांनी चढाया केल्या. या वेळेत संध्यामठचा गोलरक्षक विनायक शिंदे याने उत्कृष्ट गोलक्षेत्ररक्षण केले.
-------------
आजचे सामने
- खंडोबा तालीम मंडळ विरूद्ध कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ, वेळ - दुपारी २ वाजता.
- पाटाकडील तालीम मंडळ विरूद्ध झुंजार क्लब, वेळ - दुपारी ४ वाजता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT