कोल्हापूर

शिवराज्याभिषेक बैठक

CD

04318
...

‘शिवरायांच्या विचारांचे पाईक होऊया’

मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक नियोजनासाठी बैठक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २२ : ‘सहा जूनला शहरात होणाऱ्या शिवराज्याभिषेक मिरवणुकीत मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम असणार नाही. कोणी मावा अथवा मद्य पिऊन आले तर त्याला मिरवणुकीत थारा देणार नाही’, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज येथे दिला. शिवरायांच्या विचारांचे पाईक होऊन सर्व समाज घटकांनी शिवराज्याभिषेक साजरा करायचा आहे. यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे होत असून, तो थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये बैठक झाली.
श्री. मुळीक म्हणाले, ‘शिवराज्याभिषेकात तिथी तारखेचा वाद नको. हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या रयतेचा हा लोकोत्सव आहे. शिवरायांच्या विचारांतून दूरदृष्टी घेऊन त्यांचे चरित्र अभ्यासूया. कोणी शिवचरित्राला डाग लावण्याचा प्रयत्न केला तर शिवचरित्राची पारायणे घातली जातील. वैचारिक पातळीवर शिवचरित्र जनतेत बिंबवण्यासाठी प्रयत्न करत राहू. केवळ उत्सवात अडकून चालणार नाही.’
ते म्हणाले,‘ शिवाजी ही तीन अक्षरे कमी झाली तर जगणे अवघड होईल. या शब्दांचे महत्त्व ओळखून मिरवणुकीत सहभागी होऊया. ढोल-ताशा, पारंपरिक वेशभूषेतील महिला, शिवविचारांवर आधारीत फलक मिरवणुकीत आणूया.’
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘शहरात सतरा वर्षे शिवराज्याभिषेक साजरा केला जात असून, त्यात सातत्य आहे. तीनशेव्या शिवराज्याभिषेकावेळी शहरात झालेल्या मिरवणुकीत दहा हत्ती होते. व्याख्यानमाला झाली होती. राज्याभिषेकाद्वारे शिवरायांनी महाराष्ट्र धर्माची पुर्न:स्थापना केली. नवी कालगणना सुरू करून परकीय भाषेवरील वर्चस्व कमी केले.’ कादर मलबारी यांनी शिवरायांबद्दल कोणी अपशब्द बोलला तर त्याला हिसका दाखविण्यात येईल, असे सांगितले.
बैठकीत संभाजीराव जगदाळे, महादेव यादव, किशोर घाटगे, बाबूराव बोडके, छगन नांगरे, मिलिंद सावंत, आनंद म्हाळुंगेकर, शिवाजीराव परुळेकर, जनार्दन पाटील, बाजीराव नाईक, अंजली जाधव, विजय पाटील, उदय देसाई, शैलजा भोसले, सहदेव गुरव, हसन देसाई यांनी सूचना केल्या. बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.
----
* बैठकीतील सूचना :
- छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज भेट प्रसंगावर सजीव देखावा व्हावा.
- शिवचरित्रावर व्याख्यानमाला घ्यावी.
- ‘शिवरायांचा सर्वधर्मसमभाव’ विषयावर पुस्तिका प्रसिद्ध करावी.
- शिवराज्याभिषेकाबाबत देशातील सर्व राज्यांत जनजागृती करावी.
- शिवस्मारकांचे सुशोभिकरण व रोषणाई करावी.
---

* अशी होणार मिरवणूक...

- करबल पथकाद्वारे शिवरायांना मानवंदना देण्यात येणार.
- पाचशे वारकरी सहभागी होणार.
- पांरपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग असणार.
- खंडोबा-वेताळ मर्दानी खेळ पथक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करणार.
- मल्हार सेनेसह घिसाडी समाजाचे कार्यकर्ते सहभागी होणार.
- बारा बलुतेदारांचा सहभाग असणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT